नागपुरात पोलिसाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:36 IST2020-11-24T00:34:53+5:302020-11-24T00:36:19+5:30

Rape case filed against police, crime news लग्नाच्या आणाभाका घेऊन तीन वर्षापासून वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या पोलिसाने आता लग्नास नकार दिला. त्यामुळे त्याच्या प्रेयसीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला.

Rape case filed against police in Nagpur | नागपुरात पोलिसाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

नागपुरात पोलिसाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देप्रेयसीने लावला पोलिसावर बलात्काराचा आरोप : आरोपी पोलिस फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लग्नाच्या आणाभाका घेऊन तीन वर्षापासून वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या पोलिसाने आता लग्नास नकार दिला. त्यामुळे त्याच्या प्रेयसीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला. गिट्टीखदान ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पोलिस फरार झाला. रिजवान खान (वय २७) असे त्याचे नाव असून तो पोलिस मुख्यालयातील एमटी सेक्शनमध्ये कार्यरत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिजवानचे मानेवाड्यातील एका तरुणीसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. रिजवान अलीकडे तिला टाळत असल्यामुळे तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव वाढवला होता. तिने तगादा लावल्याचे पाहून काही दिवसांपूर्वी रिजवान ने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सदर तरुणीने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. रिजवानने लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि आता तो लग्नास नकार देत आहे, असेही तक्रारीत नमूद केले. त्यावरून पोलिसांनी रिजवानविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रिजवान फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Rape case filed against police in Nagpur