शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

माणसाला माणसाशी जोडण्याचा प्रयत्न रामदास आठवले : भारत भीमयात्राचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 03:04 IST

जाती तोडो, भारत जोडो हा समता संदेश घेऊनच भारत भीमयात्रा देशभरात फिरत आहे.

नागपूर : जाती तोडो, भारत जोडो हा समता संदेश घेऊनच भारत भीमयात्रा देशभरात फिरत आहे. या यात्रेमधून माणसाला माणसाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा आमाचा प्रयत्न आहे, असे विचार रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (ए) अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी येथे मांडले.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) नागपूर जिल्ह्याच्यावतीने मंगळवारी संविधान चौकात भारत भीम यात्राचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर रिपाई (ए)चे महाराष्ट्राचे अध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, भीमराव बन्सोड, एल.के. मडावी, पवन गजभिये, केशव धाबर्डे, सुधाकर तायडे, दयाल बहादुरे, राजन वाघमारे, दादाकांत धनविजय आदी उपस्थित होते.खा. आठवले म्हणाले, समाजात परिवर्तन होत असताना खैरलांजी सारखे प्रकरण घडत आहे. म्हणून आपण जागे होऊन, एकत्र येऊन या विरोधात लढा दिला पाहिजे. परंतु अजूनही आपण गटागटात विखुरल्या गेलो आहोत. नागपुरातील उत्तर नागपूरची जागा सोडल्यास कुठूनच आपण आपल्या मतावर निवडून येत नाही.या उलट दुसरे नेते आपल्या मतांवर निवडून येत आहे. भाजपाला साथ दिली याचा अर्थ असा नव्हे की आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘अजेंडा’ चालवितो. ही एक राजकीय युती आहे. भविष्यात आम्ही या पक्षासोबत राहूच असे नाही, असेही ते म्हणाले. भूपेश थुलकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समतेचे विचार आहे, आणि याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही भारत भीमयात्रेला सुरुवात केली आहे. २६ जानेवारीला कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा २८ हजार किलोमीटरचे अंतर कापत मंगळवारी नागपुरात आली आहे. या यात्रेचा समारोप १ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म स्थळ महू या ठिकाणी होईल. त्यांनी यावेळी विदर्भात समता सैनिक दलाची स्थापना करण्यासाठी जबाबदारी स्वीकारा, असे आवाहन केले.यावेळी सुधाकर तायडे, दुर्वास चौधरी, भीमराव बन्सोड, बाळू घरडे व अनिल गोंडाणे यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक आर.एस. वानखेडे यांनी केले. संचालन राजू बहादुरे यांनी तर आभार डॉ. मनोज मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करणाररिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी भूमिका आहे. एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष, असा माझा नारा आहे. परंतु या नंतर जर कुणी फाटाफूट करीत असेल तर त्याला आपल्या जिल्ह्यात, शहरात पाय ठेवू देऊ नका, असे आवाहन खा. आठवले यांनी केले.