शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र कापगतेला सहा वर्षे कारावासाची शिक्षा

By admin | Updated: January 5, 2017 02:13 IST

बंदुकीच्या गोळ्या झाडून सख्ख्या साळ्याची हत्या करणाऱ्या डॉ. राजेंद्र कापगतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी

हायकोर्ट : जन्मठेप रद्द, साळ्याची केली होती हत्या नागपूर : बंदुकीच्या गोळ्या झाडून सख्ख्या साळ्याची हत्या करणाऱ्या डॉ. राजेंद्र कापगतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून ६ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी हा निर्णय दिला. या घटनेची त्यावेळी शहरात सर्वत्र चर्चा झाली होती. मृताचे नाव प्रशांत नाकाडे होते. ३१ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने कापगतेला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध कापगतेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून कापगतेला भादंविच्या कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. डॉ. कापगते साकोली येथे व्यवसाय करीत होता. त्याचे पत्नी नितासोबत पटत नव्हते. त्यामुळे निता माहेरी रहायला गेली होती. कापगते तिला परत येण्यास सांगत होता. १२ फेब्रुवारी २०११ रोजी महाकाळकर सभागृह येथे त्यांच्या नातेवाईकाचे लग्न होते. निता त्या लग्नाला गेली नव्हती. त्यामुळे कापगतेने निताचे काका भय्याजी व भाऊ मयत प्रशांतला याबाबत विचारणा केली. त्यावरून प्रशांत व कापगतेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, कापगतेने रागाच्या भरात स्वत:च्या बंदुकीतून प्रशांतवर दोन गोळ्या झाडल्या. परिणामी प्रशांत जागेवरच ठार झाला. कापगते गेल्या २०११ पासून कारागृहात आहे. कापगतेतर्फे वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता व अ‍ॅड. आकाश गुप्ता, राज्य शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता मयुरी देशमुख तर, मयताच्या कुटुंबातर्फे अ‍ॅड. समीर सोनवने यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)