शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भूजल स्तर वाढवण्यासाठी पावसाच्या पाण्याचा वापर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील पावसाळी नाल्या बुजल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. या पाण्याचा वापर भूजल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील पावसाळी नाल्या बुजल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. या पाण्याचा वापर भूजल स्तर वाढवण्यात करता येईल का? याचा विचार करायला हवा. जर हे शक्य असेल तर तसा प्रस्ताव तयार करून पावसाळ्यापूर्वी यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

यासंदर्भात मनपा मुख्यालयाच्या डाॅ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, दिव्या धुरडे, वरिष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, राजेश भुतकर, अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, धनराज मेंढुलकर, अनिल गेडाम, गुरुबक्शानी आदी उपस्थित होते.

महापौर तिवारी म्हणाले, सेंट्रल एव्हेन्यूवर जे महत्त्वपूर्ण पार्किंग स्थळ आहे. तिथे रेन वाॅटर हार्वेस्टिंग करून रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्याला डायव्हर्ट करून तेथील भूजल स्तर वाढवण्याबाबतचा प्रयत्न करायला हवा. शहरातील उद्यानांबाहेरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहते. त्या ठिकाणीही या पद्धतीचा विचार करता येऊ शकते. जेणेकरून परिसरातील बोअरवेल, विहिरी आदींमधील भूजलाचा स्तर वाढू शकेल आणि तिथे वर्षभर पाणी उपलब्ध राहील. या विषयावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. पावसाळा लागण्यापूर्वी हे प्रयोग करावेत, असे निर्देश महापौरांनी दिले.

.

बाॅक्स..

ड्रेनेज विभागाचे पुनर्गठण आवश्यक

महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, शहरातील अनेक ठिकाणी नाल्या चोक होतात. काही ठिकाणी मनुष्यबळाच्या साहाय्याने तर काही ठिकाणी मशीनद्वारे चेंबर क्लियर केले जातात. परंतु बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग (स्वच्छता) यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने अनेकदा चेंबर साफ करण्यास अडचणी येतात. त्यामुळे ड्रेनेज विभागाचे पुनर्गठण होणे आवश्यक आहे.