शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

रेल्वे एम्प्लॉईज कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी : रेल्वे कर्मचा-यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 11:17 PM

रेल्वे एम्प्लॉईज कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी (दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे, किंग्स वे, सदर) च्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली लाखोंची रक्कम बँकेत न भरता स्वत:च हडपली. तब्बल १३ वर्षांनंतर हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या फसवणूक प्रकरणात सहभागी असलेल्या सोसायटीच्या १७ पदाधिकारी-संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घडामोडीमुळे रेल्वे कन्झ्युमर्स सोसायटीसह कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांनीच घातला गंडा : १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल१३ वर्षांनंतर गैरप्रकार उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे एम्प्लॉईज कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी (दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे, किंग्स वे, सदर) च्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली लाखोंची रक्कम बँकेत न भरता स्वत:च हडपली. तब्बल १३ वर्षांनंतर हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या फसवणूक प्रकरणात सहभागी असलेल्या सोसायटीच्या १७ पदाधिकारी-संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घडामोडीमुळे रेल्वे कन्झ्युमर्स सोसायटीसह कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.अरुण एम. फाले, पवन खाडे पाटील, के. सुब्रमण्यम, व्ही. लक्ष्मी नायडू, भूषण गजभिय , सुरेश जांभूळकर, त्रिशरण सहारे, दादा अंबादे, हरिशचंद्र धुर्वे, मोहनसिंग नागपुरे, गुलाम अब्बारा, व्ही.व्ही. पाठक, आर. गणेश, शिवशंकर पौनीकर, आर. बी. अपोतीकर, प्रदीप कांबळे आणि डी.आर. मेश्राम अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.रेल्वे एम्प्लॉईज कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही अनेक वर्षे जुनी आणि विश्वासपात्र मानली जाणारी रेल्वे कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे. सोसायटीचे शेकडो सभासद असून, सोसायटीची उलाढालही कोट्यवधीत आहे. १५ वर्षांपूर्वी सुमारे ७५० सभासदांनी बँकेचे कर्ज उचलले. या कर्जाची परतफेड सोसायटीच्या माध्यमातून करण्याचे ठरले होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून महिन्याला विशिष्ट रक्कम कपात करून ती सभासदाच्या बँकेच्या कर्ज खात्यात जमा करायची होती. त्यानुसार, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक सभासदांकडून कर्जाच्या परतफेडीसाठी विशिष्ट रक्कम वसूल केली. मात्र, ती बँकेत जमा न करता उपरोक्त पदाधिकाऱ्यांनी स्वत:च हडपली. दरम्यान, महिन्याला नियमित पगारातून कर्जाचा हप्ता वळता होत असल्याने बँक कर्मचाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. यादरम्यान अनेक कर्जदार बँक सभासद (कर्मचारी) रेल्वेतून निवृत्त झाले. अशातीलच निवृत्त झालेले रेल्वे कर्मचारी राघोलालजी इंदूरकर (वय ७१, रा. बँक कॉलनी, नालंदानगर, नारी) यांच्या पगारातून उपरोक्त आरोपी पदाधिकाऱ्यांनी सप्टेंबर २००५ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत कर्जाच्या २० मासिक हप्त्याची रक्कम तसेच जमा केलेल्या चेकची रक्कम अशी एकूण ४१, ५०२ रुपये वसूल केली. मात्र, इंदूरकर यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याऐवजी आरोपींनी ही आणि इंदूरकर सारख्या अनेकांची लाखोंची रक्कम स्वत:च हडपली. बँकेतून कर्ज वसुलीचा नोटीस आल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला.हडपलेली रक्कम कोट्यवधीतआरोपी पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केलेल्या रेल्वे कर्मचाºयांची संख्या शेकडोत असून, आरोपींनी हडप केलेली रक्कम कोट्यवधीत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, १३ वर्षांपासून सुरू असलेल्या या बनवाबनवीचा भंडाफोड ५ महिन्यांपूर्वी झाला. ऑगस्ट २०१८ पासून संबंधित सदस्यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे जाब विचारणे सुरू केले. आपले बिंग फुटणार, पोलिसांतही तक्रार दाखल होईल, याची कल्पना आल्यामुळे आरोपी पदाधिकाऱ्यांनी ही सोसायटीच बंद केली. सोसायटीचा गाशा गुंडाळल्यानंतर आरोपींनी हात वर करून आपला आता त्या सोसायटी तसेच सोसायटीच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचा कांगावा सुरू केला. त्यामुळे इंदूरकर तसेच अन्य १५ ते २० कर्मचाऱ्यांनी भ्रष्ट पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी करणे सुरू केले. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केली आणि आता गुन्हा दाखल केला.थकीत कर्ज कोट्यवधींचे तरीही बँक अधिकाऱ्यांची चुप्पीसर्वात जुन्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विश्वासाची समजली जाणारी ही सोसायटी भ्रष्ट पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थीपणामुळे अखेर बंद पडली. विशेष म्हणजे, पोलिसांनी केवळ १७ पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण चौकशीत ठेवले आहे. या पदाधिकाऱ्यांसोबत काही रेल्वे अधिकारी आणि बँक अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, सोसायटीचे सदस्य असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडे बँकेचे १० ते १२ कोटींचे कर्ज थकीत आहे. थकीत कर्जदारांची संख्या ७०० पेक्षा जास्त आहे. यातील बहुतांश सदस्य निवृत्त आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावरील आहेत. त्यांच्यापैकी ३० टक्के कर्जदारांनी बँकेशी थेट सेटलमेंट केले. मात्र, ४०० पेक्षा जास्त सदस्यांचे प्रकरण वादग्रस्त झाले असताना बँकेचे अधिकारी गप्प कसे बसले, ते कळायला मार्ग नाही. या प्रकरणाची उच्चस्तरावरून चौकशी झाल्यास अनेक किस्से पुढे येण्याची तसेच आरोपींची संख्या वाढण्याचीही शक्यता संबंधित सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेfraudधोकेबाजी