शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचे आंदोलन नैराश्यातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 02:49 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे जमीन अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठीचे आंदोलन म्हणजे निराश झालेल्या नेत्याचे आंदोलन आहे.

नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे जमीन अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठीचे आंदोलन म्हणजे निराश झालेल्या नेत्याचे आंदोलन आहे. लोकसभेतील पराभवाच्या नैराशातून ते काहीतरी करीत असल्याचा भास निर्माण करीत आहेत. या आंदोलनाशी शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केली. नागपुरात एका लग्न समारंभासाठी आले असता, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते. पक्षाचे केंद्रीय संघटनमंत्री रामलाल व व्ही. सतीश उपस्थित होते. या वेी दानवे म्हणाले, औरंगाबाद महापालिका निवडणूक शिवसेना-भाजप युतीने संयुक्तपणे लढविली होती. त्यानुसार महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बैठकीत सूत्र ठरले असून युतीचाच महापौर होईल. शिवसेनेचे नगरसेवक संख्यने अधिक असल्याने पहिले दीड वर्ष त्यांच्याकडे महापौरपद राहील. त्यानंतर एक वर्ष भाजपचा महापौर असेल. त्यापुढील अडीच वर्ष पुन्हा शिवसेनेचा महापौर असेल. उपमहापौरपद चार वर्ष भाजपकडे तर एक वर्ष शिवसेनेकडे राहील. स्थायी समितीचे अध्यक्षपद तीन वर्ष भाजपकडे तर दोन वर्ष सेनेकडे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे आदींनी दानवे यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)