शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळ घालणाऱ्या मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 23:30 IST

येणाऱ्या-जाणाऱ्यांना दगड मारून गोंधळ घालणाऱ्या एका मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस दलात मात्र या घडामोडीमुळे खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देउलटसुलट चर्चेला उधाण : पोलीस वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येणाऱ्या-जाणाऱ्यांना दगड मारून गोंधळ घालणाऱ्या एका मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस दलात मात्र या घडामोडीमुळे खळबळ निर्माण झाली आहे.मृत अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील आहे. ताजुद्दीन बाबा दर्गाह परिसरात मंगळवारी सायंकाळी ६. ४० वाजता ही व्यक्ती आरडाओरड करीत होती. दगड मारून गोंधळ घालत होती. ही माहिती कळाल्याने सक्करदरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. तेथेही पोलिसांना शिवीगाळ करून अंगावर धावण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी मेडिकलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, सक्करदरा पोलिसांनी मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मनोरुग्णालय प्रशासनाने त्याला न्यायालयात हजर करण्यास सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्याला बुधवारी दुपारी न्यायालयात नेले. तो सारखी शिवीगाळ आणि आरडाओरड करीत होता. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यासमोर त्याने असे वर्तन करू नये म्हणून पोलिसांनी त्याला व्हॅनमध्ये बसवून ठेवले अन् न्यायालयात कागदपत्रे तयार करू लागले. तो व्हॅनमध्ये झोपल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. काही वेळेनंतर त्याला पोलिसांनी उठविण्याचे प्रयत्न केले. मात्र, तो निपचित पडून होता. परिणामी हादरलेल्या पोलिसांनी त्याला दुपारी ४.३५ वाजता मेयोत नेले. तेथील डॉक्टरांनी मनोरुग्णाला तपासून मृत घोषित केले. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मनोरुग्णाचा मृत्यू नेमका कसा झाला, तो नैसर्गिक आहे की मारहाणीमुळे त्याबाबत उलटसुलट चर्चा असून, वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. वैद्यकीय अहवालानंतर मनोरुग्णाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सक्करदरा पोलीस सांगत आहेत.सीआयडी करणार तपासपोलिसांच्या ताब्यात असताना कुणाचा मृत्यू झाल्यास (कस्टडी डेथ) त्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अण्वेषण (सीआयडी) कडे सोपविला जातो. हे प्रकरण असेच आहे. मनोरुग्णाचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याचा तपास सीआयडी करणार आहे. सक्करदरा पोलिसांनी त्यासंबंधाने गुरुवारी वरिष्ठांकडे कागदोपत्री माहिती दिली आहे. तत्पूर्वी न्यायदंडाधिकाऱ्याच्या निर्देशानुसार शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस