शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलधारी लुटारूंचा हैदोस

By admin | Updated: February 13, 2015 02:16 IST

गणेशपेठ, गांधीबागसारख्या वर्दळीच्या भागात तब्बल एक तास हैदोस घालून पिस्तुलधारी आरोपींनी एका व्यापाऱ्याला लुटले. एकाला लुटण्याचा प्रयत्न केला तर एका व्यक्तीला मारहाण केली.

नागपूर : गणेशपेठ, गांधीबागसारख्या वर्दळीच्या भागात तब्बल एक तास हैदोस घालून पिस्तुलधारी आरोपींनी एका व्यापाऱ्याला लुटले. एकाला लुटण्याचा प्रयत्न केला तर एका व्यक्तीला मारहाण केली. या घटनेमुळे शहर पोलिसांच्या सक्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे.सराफा व्यापारी रामू शंकरराव हरडे (वय ५५, चिटणीस पार्क) हे आज सकाळी ८.३० वाजता गांधीसागर तलावाच्या बाजूला मॉर्निंग वॉक करीत होते. तेवढ्यात मोटरसायकलवर (क्र. ०९५५) तीन आरोपी आले. ‘शर्माजीचे घर कुठे आहे’, असे विचारत त्यांनी हरडे यांना थांबवले. त्यानंतर पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत हरडे यांच्या गळ्यातील सोनसाखळी, लॉकेट आणि ब्रासलेट असे १ लाख ६३ हजारांचे दागिने हिसकावून घेतले. आरोपी पळून गेल्यानंतर हरडे यांनी गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला. या घटनेच्या एक तासापुर्वी अशीच एक घटना गांधीबागेत घडली. कापड व्यापारी शांतिलाल निशनदास पुनियानी (वय ७०) हे गांधीबागमधील हॉटेल अन्नपूर्णाजवळ राहतात. सेवाभावी पुनियानी अनेक सामाजिक संघटनांशी जुळलेले आहेत. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी ७.३० च्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत होते. त्यांना धारस्कर मार्गावरील भगवान नृसिंह मंदिरासमोर तीन आरोपींनी अडवले. आम्ही सीआयडीची माणसं आहोत, असे आरोपी म्हणाले. पुनियानी यांनीओळखपत्र दाखवायला सांगितले असता आरोपींनी ‘रोकडा निकालो, वर्ना ...’ असे म्हणून लगेच पिस्तूल काढले. एवढ्यात तेथून जाणारे सुरेंद्र धनचंद जैन यांना पुनियानी दिसले. त्यांच्या बाजूला असलेल्या व्यक्तींचा संशय आल्यामुळे जैन थांबले. त्यांनी आरोपींना विचारणा केली असता, आरोपींनी जैन यांना मारहाण केली आणि पिस्तुलचा धाक दाखवून पळवून लावले. ते पाहून बाजूच्या अनेकांनी तिकडे धाव घेतली. त्यामुळे आरोपींनी पल्सरवरून पळ काढला. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या जैन यांनी पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. मात्र तहसील पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचेपर्यंत गणेशपेठेत लुटमारीची घटना घडली. (प्रतिनिधी)