शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मॉरिसच्या प्रतिष्ठेला धक्का

By admin | Updated: June 18, 2016 02:17 IST

विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (मॉरिस) संस्कृत विभागातील प्राध्यापकाच्या...

प्राध्यापकाचा त्रास : विद्यार्थिनी पोहोचल्या ठाण्यातनागपूर : विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (मॉरिस) संस्कृत विभागातील प्राध्यापकाच्या असभ्य वर्तनामुळे संस्थेत वादळ उठले आहे. या प्राध्यापकामुळे त्रस्त असलेल्या विद्यार्थिंनींनी न्यायासाठी शुक्रवारी थेट पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. प्राध्यापकाच्या असभ्य वर्तनाचा वाद विद्यापीठातही पोहोचला आहे. तक्रारकर्त्या विद्यार्थिनी एम.ए.(संस्कृत) शेवटच्या वर्षात या संस्थेत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थिंनींना संस्कृत विभागाचे विभागप्रमुख डॉ. ओमकुमार टोम्पे यांच्याकडून वर्षभर चुकीची वागणूक देण्यात आली. आपणास मी परीक्षेत अनुत्तीर्ण करील, अशी सातत्याने धमकी टोम्पे यांच्याकडून देण्यात येत होती. मात्र शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थिनी गप्प बसल्या. प्राध्यापकाकडून होणाऱ्या त्रासाची त्यांनी संस्थेच्या संचालकांकडे मध्यल्या काळात तक्रारकेली होती. मात्र याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप प्रज्ञा लांडे, एरिना बालपांडे, रोशनी वेरुळकर, कल्याणी चवरे या विद्यार्थिंनींनी केला आहे. अलीकडे विद्यापीठाच्यावतीने एम.ए.संस्कृत विषयाचा निकाल जाहीर झाला आहे. यात या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या इंटर्नल परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या लेखी परीक्षेत चांगले गुण मिळाले असतानाही प्राध्यापक टोम्पे यांनी आपल्याला इंटर्नल आणि मौखिक परीक्षेत अनुत्तीर्ण केल्याचे लक्षात आल्यावर चारही मुलींनी संस्थेचे संचालक प्रा.भाऊ दायदार यांचे कार्यालय गाठले. दायदार यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन या विद्यार्थिंनींना दिले. शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भीतीने त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती प्र-कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी गुरुवारी दिली. मात्र इंटर्नल परीक्षेचे गुण महाविद्यालयाकडून पाठविण्यात येत असल्याने याप्रकरणात संस्थेच्या संचालकांनी लक्ष घालावे, या विद्यापीठामार्फत या प्रकरणाची माहिती मागविण्यात येईल, असे आश्वासन या विद्यार्थिंनींना देण्यात आले. मात्र प्रशासकीय कारवाईत होणारा विलंब लक्षात घेता शुक्रवारी या विद्यार्थिंनींनी पालकांसह सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. यात प्रा.ओमकुमार टोम्पे यांच्याकडून देण्यात आलेल्या असभ्य वर्तणुकीचे कथन त्यांनी पोलीस अधिकाऱ्यापुढे केले. प्राध्यापक टोम्पे आम्हाला क्रिमिनल आहात असे सांगत परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याची सातत्याने धमकी देत असल्याचे या विद्यार्थिंनींनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)प्रा.ओमकुमार टोम्पे यांच्याकडून होणाऱ्या वर्तनाची तक्रार विद्यार्थिंनींनी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच योग्य ते सांगता येईल.- प्रा.भाऊ दायदार, संचालक, मॉरिसमी कर्तव्याशी प्रामाणिक आहे. माझ्याविरुद्ध करण्यात आलेली तक्रार चुकीची आहे. परीक्षकाला गोपनीयतेचा भंग करता येत नाही. त्यामुळे काही बाबी सर्वाजनिक करता येणार नाही. मात्र वरिष्ठांना याबाबत वस्तुस्थिती सांगेल.- प्रा.ओमकुमार टोम्पे