शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार बंधाऱ्यासाठी ६०० कोटींची तरतूद

By admin | Updated: January 30, 2015 00:48 IST

सिंचन क्षेत्रात आघाडी शासनाच्या काळात मोठा गैरप्रकार झाला असून याप्रकरणी चौकशी सुरू असली, तरी दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी युती सरकारने धडक मोहीम हाती घेतली आहे.

तलाव दुरूस्तीसाठी योजना : जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची पत्रपरिषदभंडारा : सिंचन क्षेत्रात आघाडी शासनाच्या काळात मोठा गैरप्रकार झाला असून याप्रकरणी चौकशी सुरू असली, तरी दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी युती सरकारने धडक मोहीम हाती घेतली आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून राज्यभरात सिंचन क्षेत्र वाढविण्यात येईल, असे सांगून सहा हजार नवीन बंधाऱ्यासाठी ६०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पासह काही उपसा सिंचन योजनेची पाहणी केल्याचे सांगून ते म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या नवीन मागण्या पूर्ण केल्या असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. गोसीखुर्द धरणानजीक जलविद्युत प्रकल्पाचे काम संथगतीने असले, तरी कामाची गती वाढविण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अत्यल्प दराने वीज उपलब्ध होऊ शकेल. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात सातही तालुक्यांना भेटी देऊन तालुकानिहाय कामाचा आढावा घेतला असता अनेक समस्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. मागील आघाडी शासनाच्या काळात मनमानी पद्धतीने कामाचे वाटप करण्यात आले होते. याची सखोल चौकशी सुरू असून कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या माजी मालगुजारी तलाव व इतर लघु योजनांच्या दुरूस्तीसाठी तत्कालीन सरकारने निधी दिला नाही. मात्र युती शासन या तलावाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी धडक मोहीम राबविणार आहे. आमदार-खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून निधी देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. याचे अनुकूल निकाल हाती येतील आणि राज्यभरातील सुमारे १३.५ लाख हेक्टर एकरात सिंचन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, जिल्हा उपप्रमुख प्रशांत लांजेवार, सुनील कुरंजेकर व पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)