शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा रोडवरील परिस्थितीची माहिती द्या

By admin | Updated: June 11, 2015 02:45 IST

भंडारा रोडवरील अनधिकृत पारडी बाजार, फेरीवाले, फूटपाथवरील अतिक्रमण इत्यादी समस्या

हायकोर्ट : याचिकाकर्त्याला एक आठवड्याचा वेळनागपूर : भंडारा रोडवरील अनधिकृत पारडी बाजार, फेरीवाले, फूटपाथवरील अतिक्रमण इत्यादी समस्या सोडविण्यासाठी आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, सध्याची परिस्थिती काय आहे, समस्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील इत्यादी माहितीचे सर्वसमावेशक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित याचिकाकर्त्यास दिलेत. तसेच, याचिकाकर्त्याचे प्रतिज्ञापत्र आल्यानंतर त्यावर पुढील दोन आठवड्यांत भूमिका मांडावी, असे महानगरपालिका व अन्य प्रतिवादींना सांगितले.याप्रकरणी व्यावसायिक अनिल आग्रे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. प्रशासनातर्फे नियमित कारवाई करण्यात येत नसल्यामुळे भंडारा रोडवर आताही बाजार भरतो. फेरीवाले उभे राहतात. दोन्ही बाजूच्या फूटपाथवर मेकॅनिकचा ताबा आहे. रोडच्या दोन्ही बाजूला २४ तास ट्रक उभे असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रोडला लागून मद्यविक्रीची ६ दुकाने आहेत. परिणामी स्त्रियांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दुपारी ३ ते रात्री ९ वाजतापर्यंतची परिस्थिती अत्यंत भयंकर असते असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)