शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषित बोर नदीत उतरून आंदोलन; परिसरातील १५-२० गावांना बसतोय फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:32 IST

Nagpur : परिसरातील बोर नदीतील पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. निखिल पाटील यांनी नदीपात्रात बसून जाहीर निषेध नोंदवला.

लोकमत न्यूज नेटवर्कबाजारगाव : परिसरातील बोर नदीतील पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. निखिल पाटील यांनी नदीपात्रात बसून जाहीर निषेध नोंदवला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय नागपूर यांनी ९ एप्रिल रोजी संबंधित उद्योगास पत्र देत नाल्यात साचलेल्या सांडपाण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, १ ते ८ एप्रिल रोजी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन तपासणी केली. कारखान्याच्या परिसरामागील नाल्यात रंगीत सांडपाणी साचलेले आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित उद्योगाने सांडपाण्याच्या विल्हेवाटीबाबत प्रस्ताव सादर केला. मंडळाकडून ते सांडपाणी अधिकृत वाहतूकदारामार्फत शास्त्रीय पद्धतीने सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) येथे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सांडपाण्याचे प्रमाण, वाहतूक करणाऱ्या टँकरची माहिती आणि सीईटीपीकडून नाकारण्यात आलेल्या सांडपाण्याची नोंद सादर करणे बंधनकारक असल्याचेही पत्रात नमूद आहे. यासोबतच, पर्यावरणात सांडपाणी सोडल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट इशाराही संबंधित उद्योगास देण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत झाली, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे सांगितले जात आहे.

यंत्रणेकडून कारवाई होणार का?

बोर नदीवर परिसरातील १५ ते २० गावे, मत्स्य व्यवसाय करणारे शेतकरी, नागरिक, तसेच जनावरे आणि वन्यजीव मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे. पुढील काळात संबंधित यंत्रणेकडून काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"पाणी रसायनयुक्त असल्याचा संशय व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांकडून तपासणी व सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत झाली याबाबत स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे आम्ही नदीत उतरून जाहीर निषेध नोंदवला आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी."- निखिल पाटील, आंदोलक

English
हिंदी सारांश
Web Title : Protest in Polluted Bor River; 15-20 Villages Affected.

Web Summary : Nikhil Patil protested in the Bor River due to water quality concerns affecting 15-20 villages. Authorities issued notices to industries regarding wastewater disposal, but implementation remains unclear. Locals demand immediate action to protect the river and its dependent communities.
टॅग्स :nagpurनागपूर