शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी उभारले सुरक्षा कवच

By admin | Updated: May 29, 2015 02:23 IST

शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सरस्वती विहार, त्रिमूर्तिनगर येथील महिलांनी सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन परिसरात सीसीटीव्ही लावले.

नागपूर : शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सरस्वती विहार, त्रिमूर्तिनगर येथील महिलांनी सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन परिसरात सीसीटीव्ही लावले. यासाठी महिलांनी वर्गणी गोळा केली. सरकारच्या मदतीशिवाय महिलांनी सुरक्षेबाबत दाखविलेली जागरूकता बघून परिसरात सरस्वती विहारच्या महिलांचे कौतुक होत आहे. सरस्वती विहार कॉलनीतील सीसीटीव्हीचे उद्घाटन प्रतापनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार संजय खटारे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका प्रेरणा कापसे उपस्थित होत्या. खटारे यांनी महिलांच्या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांना सुरक्षेचे महत्त्व पटवून देऊन त्यादृष्टीने मार्गदर्शन केले, शिवाय सुरक्षेच्या काही टिप्सही दिल्या. परिसरातील दारूच्या दुकानामुळे या भागात पसरलेली अस्वच्छता दूर करण्यासाठी परिसरातील महिलांनी पुढाकार घेतला आणि सरस्वती विहार महिला मंडळाची स्थापना केली. मंडळाने परिसराची सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी काम करण्याचा निश्चय केला असल्याचे मंडळाच्या अध्यक्ष चंद्रा पराते यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा खापरे यांनी तर आभार ममता फुके यांनी मानले.(प्रतिनिधी)