शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करवाढीचा दणका

By admin | Updated: March 8, 2016 02:57 IST

महापालिकेने १ एप्रिल २०१५ पासून नवीन पद्धतीने मालमत्ता कर आकारणीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रेडिरेकनरच्या आधारे

गणेश हूड ल्ल नागपूरमहापालिकेने १ एप्रिल २०१५ पासून नवीन पद्धतीने मालमत्ता कर आकारणीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रेडिरेकनरच्या आधारे कर आकारणी करण्यात आली आहे. वाढीव दरानुसार करात मोठी वाढ झाली आहे. सोबतच पथकर, शिक्षण उपकर, पाणी करलाभ व मलजल लाभ करांचा यात समावेश करून प्रशासनाने शहरातील नागरिकांना मालमत्ता करवाढीचा चांगलाच दणका दिला आहे. यामुळे नागरिकात प्रचंड नाराजी आहे. नवीन पद्धतीत मालमत्ता करात ५० ते ६० टक्के वाढ झालेली आहे. धंतोली, रामदासपेठ, शंकरनगर, सदर, महाल, लक्ष्मीनगर, वर्धमाननगर, वर्धा रोड अशा भागात वडिलोपार्जित घर असलेल्या गरीब कुटुंबांना कर भरणे कठीण झाले आहे. करवाढीमुळे भविष्यात शहरातील चांगल्या भागात वास्तव्य करणे या लोकांना कठीण होणार आहे. प्रशासनाकडून मालमत्ता करात फारशी वाढ झाली नसल्याचा दावा केला जात आहे. परंतु वास्तव वेगळेच आहे. स्लम व लहान घरात राहणाऱ्यांना २०१४-१५ या वर्षात १३८ रुपये सामान्य कर होता. नवीन पद्धतीत तो २०१ रुपये झाला आहे. तसेच ११८ रुपये मलजल कराऐवजी १७२ रुपये आकारण्यात आले आहे. शिक्षण करातही वाढ करण्यात आली आहे. सोबतच किरकोळ कराची आकारणी करण्यात आली आहे. सामान्यांना फटका जुन्या पद्धतीनुसार स्लम भागातील वा लहान घरातील नागरिकांना २०० ते ३०० रुपयांच्या आसपास कर भरावा लागत होता. परंतु नवीन पद्धतीत सरसकट कर आकारणी ५०० रुपयांच्या पुढे आहे. ही करवाढ दुपटीच्या आसपास आहे. याचा फटका प्रामुख्याने गरीब लोकांना बसला आहे. शहरात अशा नागरिकांची संख्या दोन लाखाहून अधिक आहे.