शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

By नरेश डोंगरे | Updated: November 17, 2024 18:32 IST

भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे बडकस चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला. 

नरेश डोंगरे / नागपूर : संघ मुख्यालय जवळच्या चौकात काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो करणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना भाजपा कार्यकर्त्यांनी कमळ दाखवले. प्रत्युत्तरात प्रियंका गांधी यांनी झेंडे दाखवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन, काही केले तरी येथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार असल्याची घोषणा केली. या घडामोडीमुळे बडकस चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला.

आज संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. महालमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रियंका गांधी यांनी अभिवादन केले. त्यानंतर रोड शोला सुरुवात झाली. कोतवाली चौक, केळीबाग रोड मार्गे प्रचंड गर्दीचे अभिवादन स्वीकारत प्रियंका गांधी पुढे जात होत्या.

सायंकाळी ५.४० च्या सुमारास रॅली चौकात आली असता न्यू आदर्श मिष्ठान्न भंडार असलेल्या इमारतीच्या स्लॅबवर भाजपचे कार्यकर्ते उभे होते. त्यांनी प्रियंका यांना भाजपाचे झेंडे दाखविले. ते पाहून प्रियंका यांनी त्यांना नमस्कार केला. तसेच माईक हातात घेऊन झेंडे दाखवणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, मात्र काही केले तरी येथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार, असे त्यांनी वक्तव्य केले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

दुसरीकडे उजव्या बाजूला भाजपाचे कार्यकर्ते प्रचार रॅली घेऊन पुढे जात होते. त्यांनी तिथेच थांबून प्रियंका गांधी यांच्या रोड शोला विरोध करून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्तेही त्यांच्यासमोर गेले. त्यानंतर येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच प्रचंड संख्येत असलेल्या पोलिसांनी मोर्चा सांभाळून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना वेगळे करून घोषणाबाजी बंद करण्याचा प्रयत्न केला.

कार्यकर्ते मात्र जुमानात नसल्याने त्यांना पोलिसांनी मागे रेटण्यास सुरुवात केली. यामुळे सुमारे पंधरा मिनिटे येथे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर मोठ्या संख्येतील पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना कसेबसे आवरले आणि दोन्ही रॅली आपापल्या मार्गाने पुढे निघून गेल्या. प्रचंड स्फोटक स्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येताच प्रियंका यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी बडकस चौकातून त्यांना त्यांच्या विशेष वाहनात बसविले आणि तेथून प्रियंका पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. तिकडे मात्र चौकात अर्धा तास पर्यंत तणावाचेच वातावरण होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस