शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी बसचे भाडे होऊ शकते कमी

By admin | Updated: May 15, 2014 19:45 IST

शी नागपूर : प्रवाशांना भविष्यात लांब पल्ल्याच्या खाजगी बसमध्ये प्रवासभाड्यात मोठ्या प्रमाणात सुट मिळू शकते. केंद्र शासन ऑल इंडिया परमिटच्या टॅक्सला केंद्रीयकृत करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे.

टॅक्समध्ये कपात : आता फक्त केंद्र शासनाचाच कर
वसीम कुरेशी
नागपूर : प्रवाशांना भविष्यात लांब पल्ल्याच्या खाजगी बसमध्ये प्रवासभाड्यात मोठ्या प्रमाणात सुट मिळू शकते. केंद्र शासन ऑल इंडिया परमिटच्या टॅक्सला केंद्रीयकृत करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. हा प्रस्ताव अमलात आल्यास अनेक राज्यात ३ महिन्यांसाठी १ लाख रुपयांपेक्षा अधिक टॅक्स देण्याची गरज भासणार नाही.
खाजगी बसचालकांना वर्षाचे फक्त ४० हजार रुपये केंद्रीय परिवहन विभागाला द्यावे लागणार आहेत. यामुळे खाजगी बसेसच्या भाड्यात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बस संचालकांना वेगवेगळ्या राज्यांचा पथकर द्यावा लागतो. एका प्रस्तावानुसार आता हा टॅक्स फक्त केंद्रीय परिवहन विभागाकडे वर्षभरासाठी एकदाच जमा करावा लागणार आहे. केंद्र शासनाने बसेससाठी ऑल इंडिया परमिटमध्ये टॅक्स ठरविण्यासाठी एक समिती तयार केली आहे. विविध राज्यातील परिवहन कार्यालयांना त्यांच्या राज्यात ऑल इंडिया परमिटसाठी किती टॅक्स आकारण्यात येतो याची माहिती मागितली आहे. याबाबत लवकरच माहिती पाठविण्यात येणार आहे. सूत्रांनुसार रस्ते आणि परिवहन मंत्रालयातर्फे गठित समितीची बैठक झाली आहे. परिवहन विभागाशी संबंधित काही संघटनांनी बैठकीपूर्वी आपल्या सूचनाही परिवहन मंत्रालयाला पाठविल्या आहेत. महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेच्या बससाठी ३.५० लाख रुपये टॅक्स लागतो. अनेक राज्यात तीनपट अधिक टॅक्स भरावा लागतो. आंध्र प्रदेशात १.२५ लाख तर कर्नाटकात १.३० लाख रुपये द्यावे लागतात. महाराष्ट्र राज्य बस, ट्रक, टेंपो, टँकर वाहतूक महासंघाचे अध्यक्ष महेंद्र लुले यांनी ट्रकप्रमाणे ऑल इंडिया परमिट असल्यास खाजगी वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. याशिवाय ज्या मार्गावर बसेस धावत नाहीत तेथे बसेस वाढविण्यात येऊ शकतात. यामुळे प्रवासभाडेही कमी होणार आहे. राज्यशासनाकडून टॅक्स घेऊनही रस्त्यांची अवस्था चांगली नसल्याचे त्यांनी सांगितले. नुकतीच परिवहन आयुक्त कार्यालयाने नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ऑल इंडिया परमिट व टॅक्सची माहिती मागितली आहे. आता सध्या मिळत असलेला टॅक्स पुरेसा आहे की नाही हे महाराष्ट्र शासन ठरविणार आहे. हा नियम धोरणाशी निगडित असल्यामुळे शासनच यावर निर्णय घेणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले.