शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या परीक्षांची युद्धस्तरावर तयारी

By admin | Updated: February 7, 2015 02:13 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विभागीय शिक्षण मंडळाने कंबर कसली आहे.

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विभागीय शिक्षण मंडळाने कंबर कसली आहे. बारावीच्या लेखी परीक्षेला २१ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षेला ३ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी व परीक्षा केंद्र या दोघांचीही संख्या घटली आहे. प्रश्नपत्रिकांचे संच मंडळाच्या कार्यालयात येणे सुरू झाले आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदादेखील ‘कॉपीमुक्त’ अभियानावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर विभागातून यंदा एकूण १ लाख ५६ हजार ८२० विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३६८ इतकी आहे आहे. मागील वर्षीपेक्षा बारावीच्या ७ हजार ७०२ तर दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ६४८ ने घटली आहे. परीक्षांसाठी तयारीवर जोर देण्यात येत असून बारावीची ओळखपत्रे कनिष्ठ महाविद्यालयांत पाठविण्यात आली आहेत. दहावीची ओळखपत्रेदेखील लवकरच येणे अपेक्षित आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिकेचे संच मंडळाच्या कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे. मंडळाच्या वतीने केंद्रप्रमुख आणि परीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली असून येत्या १० तारखेपासून त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)