शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण दवणेंचे नागपुरात ‘सर्जिकल स्ट्राइक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 03:23 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली आहे

मिशन इलेक्शन : तीन दिवसीय मुक्कामात साहित्यिकांशी भेटीगाठी नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली आहे असे प्रसिद्ध कवी व गीतकार प्रवीण दवणे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’ स्टाईलने नागपुरात डेरेदाखल झाले असून या तीन दिवसीय मुक्कामात ते साहित्यिकांशी भेटीघाटी घेत निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. बुधवारी नागपुरात पोहोचलेल्या दवणे यांनी महामंडळाकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. आज गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. हा माझा प्रचार दौरा नाही. पण, नागपुरात आलोच आहे तर भेटीगाठी या होणारच आणि भेट झाली तर निवडणुकीच्या चर्चेशिवाय ती कशी पूर्ण होईल, असा प्रतिप्रश्न आपल्या खास शैलीत उपस्थित करून त्यांनी नागपूर भेटीचे ‘प्रयोजन’ सांगितले. मी ही निवडणूक लौकिकासाठी लढत नाहीये. भाषा, संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या डोक्यात आदर्श संमेलनाची जी कल्पना आहे ती वास्तवात उतरावी, हे संमेलन संवेदनेचा, समन्वयाचा उत्सव व्हावा, तरुणाईच्या मनात वाङ्मयीन उमेद जागवता यावी, हा माझा प्रयत्न आहे. मी उद्या जर संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून आलो तर या संमेलनाचा चेहरा तरुण होणार हे नक्की आहे. मला व एकूणच साहित्य विश्वाला हेच हवे आहे, याकडेही दवणे यांनी विशेष लक्ष वेधले. (प्रतिनिधी)पहिला आणि अखेरचा प्रयत्नमी मनाच्या सुप्त तारांना अलवार शब्दांनी झंकारणारा कवी आहे. निवडणूक, राजकारण हा माझा पिंड नाही. साहित्य क्षेत्रातील माझ्या थोड्या-अधिक योगदानाच्या बळावर मी मराठी साहित्य संमेलनाला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात यश मिळते की अपयश याची मला पर्वा नाही. हा माझा पहिला नि शेवटचा प्रयत्न आहे. निवडून आलो तर अध्यक्ष म्हणून माझ्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या वास्तवात उतरविण्यासाठी प्रयत्न करेल आणि यश नाहीच मिळाले तर पुन्हा लिखाणाच्या कामात स्वत:ला गुंंतवून घेईल. तिकडेही खूप काम करायचे अजून बाकी आहे.डॉ. काळेंचे काम मोठेचया निवडणुकीत माझे प्रतिस्पर्धी असले तरी डॉ. अक्षयकुमार काळे यांचे समीक्षेच्या क्षेत्रातील काम मोठेच आहे. ते नागपूर-विदर्भाचे असल्याने येथील मतदारांमध्ये त्यांच्याप्रती विशेष आस्था असणे स्वाभाविक आहे. परंतु मी भौगोलिक सीमा मानत नाही. मराठी साहित्याच्या जागर करीत मी देशभर फिरत असतो. त्यामुळे नागपूर-विदर्भातही माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहेतच. त्यांची साथ मिळेल, अशी मला अपेक्षा आहे.