शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सत्यपाल महाराज यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:09 IST

सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. याच श्रुंखलेत सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.फाऊंडेशनच्यावतीने येत्या २१ सप्टेंबर रोजी साई सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजित भव्य समारोहात सत्यपाल महाराज यांना हा पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यावेळी राज्याचे माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी खासदार अजय संचेती प्रामुख्याने उपस्थित राहतील. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेत हा समारोह होईल. प्रबोधनकार ठाकरे यांच्या परिवर्तनवादी कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी मारवाडी फाऊंडेशनतर्फे दरवर्षी त्यांच्या नावाने प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. गेल्या अनेक वर्षापासून सत्यपाल महाराज यांनी अनोख्या शैलीने व सप्तखंजेरीने लोकांमध्ये परिवर्तनाचे विचार पोहचविले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत असल्याचे फाऊंडेशनचे डॉ. गिरीश गांधी यांनी सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर