शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मार्गावर खड्ड्यांचे विघ्न

By admin | Updated: August 20, 2016 02:24 IST

गणेशोत्सव तोंडावर आहे. मात्र, विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुका निघणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे विघ्न आहे

महापालिकेला आली जाग : २ सप्टेंबरपर्यंत खड्डे भरण्याचे निर्देश नागपूर : गणेशोत्सव तोंडावर आहे. मात्र, विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुका निघणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे २ सप्टेंबरपर्यंत भरा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी दिले आहेत. सोबत विसर्जन मार्गावर पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवारी महापौर प्रवीण दटके यांनी गणेशोत्सवाच्या तयारीबाबत आढावा बैठक घेतली. तीत उपमहापौर सतीश होले, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थापत्य समिती सभापती सुनील अग्रवाल, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे आदी उपस्थित होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार यावेळी गणेश मंडळांना विविध प्रकारची परवानगी घ्यायची आहे. त्यासाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे मुख्यालय तसेच टाऊन हॉलमध्ये ही व्यवस्था केली जाईल. महापौर दटके यांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक झोनमध्ये उपलब्ध असलेल्या कृत्रिम टाक्या, सिमेंट टाक्या तसेच कृत्रिम तलावांची माहिती घेतली. (प्रतिनिधी) आजारांप्रति जागरुकता या वेळी गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध आजारांप्रति जागरुकता निर्माण केली जाईल. वृक्ष संवर्धन, कृत्रिम तलाव विसर्जन, विसर्जन, मुलगी वाचवा- मुलगी शिकवा, ऊर्जा बचत, स्वच्छता मोहीम आदींबाबत माहिती दिली. त्याच प्रकारे प्रकार डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू पासून बचावाचे उपाय सुचविणारे बॅनर पोस्टर गणेश मंडळांमध्ये लावले जाईल. प्रत्येक झोनमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन मंडळांना पुरस्कृत केले जाईल. मोठ्या मूर्तींचे विसर्जन पाचगावमध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पर्यावरण पूरक गणपती संकल्पनेला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. मोठ्या मूर्तींचे विसर्जन पाचगांव येथे करता येईल का, याची माहिती घेण्याचे निर्देश दिले. सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी टोल फ्री नंबर देऊन लहान प्रतिमा व गणेश मूर्तीचे निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्याची सूचना केली.