शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉटस् अ‍ॅप’वर पाठविले अश्लील मॅसेज

By admin | Updated: January 12, 2017 01:38 IST

महिलांना व्हॉटस् अ‍ॅपवर अश्लील मॅसेज व फोटो पाठविणाऱ्या एका औषध कंपनीच्या सेल्समन युवकला अजनी पोलिसांनी अटक केली.

औषध कंपनीच्या सेल्समनला अटक : तीन महिन्यांपासून देत होता त्रास नागपूर : महिलांना व्हॉटस् अ‍ॅपवर अश्लील मॅसेज व फोटो पाठविणाऱ्या एका औषध कंपनीच्या सेल्समन युवकला अजनी पोलिसांनी अटक केली. हा आरोपी युवक गेल्या तीन महिन्यांपासून महिलांना त्रास देत होता. पीयूष जयंत महालक्ष्मे (२९) रा. खडगाव रोड वाडी, असे आरोपीचे नाव आहे. अजनी परिसरातील एका युवतीला काही दिवसांपूर्वी व्हॉटस् अ‍ॅपवर अश्लील मॅसेज आणि फोटो आला. मॅसेज व फोटो पाहून युवती चक्रावली. तिने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजनी पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारावर मॅसेज पाठविणाऱ्यास शोधून काढले. त्या व्यक्तीने वाडी परिसरात त्याचा मोबाईल हरविल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने नवीन नंबर घेतला, त्यामुळे चोरी झालेला मोबाईल नंबर व सीमबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्स’च्या मदतीने आरोपीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. चोरी गेलेला मोबाईल व सीम पीयूष वापरत हेता. तो औषध कंपनीत सेल्समनचे काम करतो. दिवसभर शहरात फिरत असल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन शोधायला वेळ लागला. यादरम्यान पीयूषने एका गुन्ह्यात वापरण्यात आलेले सीमकार्ड आपल्या मोबाईलमध्ये टाकून मॅसेज व फोटो पाठविले. पोलिसांना त्याच्या मोबाईलचा पत्ता लागला. पोलिसांनी पीयूषचा बायोडाटा काढला. तकारकर्त्या युवतीशिवाय त्याने इतर अनेक महिलांनाही याचप्रकारे मॅसेज व फोटो पाठविल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी जेव्हा महिलांना यासंदर्भात विचारणा केली, तेव्हा त्यांनी कबुली दिली. या आधारावर अजनी पोलिसांनी मंगळवारी रात्री पीयूषला अटक केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांकडे सबळ पुरावा असल्याने त्याने कबुली दिली. पीयूषनुसार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तो हे कृत्य करीत होता. त्याचे म्हणणे आहे की, त्याला हे दोन्ही सीमकार्ड व मोबाईल बेवारस अवस्थेत सापडले. त्यामुळे त्याने त्याचा असा उपयोग करायला सुरुवात केली. महिलांशी जवळीक साधण्यासाठी त्याने परिचित महिलांना व्हॉटस् अ‍ॅपवर अश्लील मॅसेज पाठविणे सुरू केले. पीडित युवतीशीसुद्धा त्याची ओळख होती. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेष शंखे, जी.जे. पाटील, एपीआय एस.के. धोबे, कर्मचारी मनोज, नीलेश्वर, तारा सिंह, भगवती तथा गायत्री यांनी केली. (प्रतिनिधी)