पॉर्न, गेम आणि ब्लॅकमेलिंग : ऑनलाइन जगाचे व्यसन की मृत्यूचा खेळ?

By सुनील चरपे | Updated: September 1, 2025 15:55 IST2025-09-01T15:55:00+5:302025-09-01T15:55:37+5:30

Nagpur : अलीकडे ग्रामीण भागात अल्पवयीन विद्यार्थी आणि तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांनी आत्महत्या का केल्या? किंवा त्यांच्या व इतरांच्या मनात एवढ्या कमी वयात आत्महत्या करण्याचा विचार का येतो? याच्या मुळाशी जाण्याचा फारसा कुणी प्रयत्न करीत नाही.

Porn, Games, and Blackmailing: Addiction to the Online World or a Game of Death? | पॉर्न, गेम आणि ब्लॅकमेलिंग : ऑनलाइन जगाचे व्यसन की मृत्यूचा खेळ?

Porn, Games, and Blackmailing: Addiction to the Online World or a Game of Death?

सुनील चरपे
नागपूर :
असा प्रयत्न कुणी केला तर त्यावर विश्वास ठेवला जात नाही. अलीकडच्या काळात घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांश सर्वजणांचे मोबाइल फोनवर राहण्याचा वेळ व प्रमाण वाढले आहे. यातूनच अनेक जण ऑनलाइन गेम, रील्स व इतर आक्षेपार्ह बाबींमध्ये गुंतले आणि गुरफटत गेले आहेत. पुढे याच सवयी त्यांच्या एकाकीपण, विचारांची घुसमट आणि आत्महत्यांना कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येते...

अलीकडे ग्रामीण भागात अल्पवयीन विद्यार्थी आणि तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांनी आत्महत्या का केल्या? किंवा त्यांच्या व इतरांच्या मनात एवढ्या कमी वयात आत्महत्या करण्याचा विचार का येतो? याच्या मुळाशी जाण्याचा फारसा कुणी प्रयत्न करीत नाही.

मूलभूत सुविधांचा अभाव
या आत्महत्यांची प्रकरणे पोलिसांत जातात; पण तपासात फार काही निष्पन्न होत नाही. देशात इंटरनेट व सोशल मीडियाचे जाळे विणले गेले हे खरे आहे; पण आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक व शिक्षा करणे, या व तत्सम सायबर क्राइमला कायमचा आळा घालण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि या घटनांचा गांभीर्याने तपास करण्याची इच्छाशक्ती यंत्रणेकडे आज तरी नाही.

समस्यांचा जन्म
अल्पवयीन मुले-मुली, तरुण-तरुणींमध्ये मोबाइल फोनचे प्रचंड आकर्षण आहे. ही मंडळी त्यांचा फावला वेळ आणि इतर महत्त्वाच्या कामांमधून वेळ काढून मोबाइलवर त्यांच्या आवडीच्या गोष्टी शोधतात व बघतात. यातून अनेकांना ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन जडते. काही ऑनलाइन गेम साधे आहेत; पण पब्जी व तत्सम गेम अनेकजण एकाच वेळी खेळतात आणि आपसांत संभाषणदेखील करतात. हे गेम खेळणाऱ्यांच्या मनाचा हळूहळू ताबा घेतात आणि तिथून नवीन समस्यांचा जन्म होतो.

मानसिक दडपण व एकाकीपणा
पब्जी व तत्सम गेममध्ये अनेक स्टेजेस आहेत. हे गेम खेळणाऱ्या व्यक्तींच्या डोक्यात त्या गेमचे २४ तास विचार घोळत असतात. यांतील एका विशिष्ट स्टेजमध्ये खेळणाऱ्या व्यक्तीला गेममधून बाहेर पडणे शक्य होत नाही. इतर ऑनलाइन असलेले गेम खेळणारे त्याच्यावर नको त्या प्रकारच्या, नको त्या शब्दांमध्ये कमेंट्स करतात. ती व्यक्ती अपयश सहन करू शकत नाही व ते कुणाला सांगूही शकत नाही.

सेक्सटॉर्शन

  • काही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता, 'सेक्सटॉर्शन' ही बाब प्रकर्षाने पुढे आली. कमी वयात सेक्सबाबत अधिक आकर्षण असणे, हे स्वाभाविक व नैसर्गिक आहे.
  • काहींना मोबाइल फोनवर पॉर्न क्लिप बघण्याची सवय जडते, तर काही विद्यार्थी सोशल मीडिया प्लॅटफार्मवर सुंदर तरुणींचे फोटो बघून काहींच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्या मोबाइल क्रमांकांची देवाणघेवाण होते. सुरुवातीचे त्यांचे साधे संभाषण नंतर व्हिडीओ कॉलपर्यंत पोहोचते.
  • त्यांना न्यूड क्लिप दाखवून आपण तरुणी असल्याचे भासवले जाते. ही मुले त्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे एकांतात अंगावरचे कपडे काढतात.
  • एकदा ही मुले नग्नावस्थेत त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली की त्याच्या व्हिडीओ एडिटिंगद्वारे क्लिप तयार करून ब्लॅकमेल करीत मोठ्या रकमेची मागणी करणे, पैसे न दिल्यास कुटुंबीय, नातेवाईक व मित्रांना सांगण्याची धमकी देणे, प्रसंगी त्या क्लिप व्हायरल करणे असले प्रकार आत्महत्यांना कारणीभूत ठरतात.


 

Web Title: Porn, Games, and Blackmailing: Addiction to the Online World or a Game of Death?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.