‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा

By Admin | Updated: August 4, 2014 01:01 IST2014-08-04T01:01:24+5:302014-08-04T01:01:24+5:30

‘रेव्ह पार्टी’मध्ये पोलिसांनी छापा मारून एका महाविद्यालयीन युवतीसह दोन युवकांना ताब्यात घेतले. अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या नवाथे चौकातील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री

The police raid on 'Rev Party' | ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा

‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा

विद्यार्थिनीसह दोघे ताब्यात : अमरावतीतील घटना
अमरावती : ‘रेव्ह पार्टी’मध्ये पोलिसांनी छापा मारून एका महाविद्यालयीन युवतीसह दोन युवकांना ताब्यात घेतले. अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या नवाथे चौकातील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली.
नवाथे चौकात शहरातील एका नगरसेवकाचे मोठे हॉटेल आहे. ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त्य रविवारी या हॉटेलमध्ये काही महाविद्यालयीन युवक-युवतींनी ‘रेव्ह पार्टी’ चे आयोजन केले होते. मद्यप्राशन करून विद्यार्थ्यांनी डिजेवर ताल धरला होता. महाविद्यालयीन युवक व युवती अर्धनग्न अवस्थेत नाच करीत असल्याची माहिती शहरातील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी याची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक एस. एस. भगत, उपनिरीक्षक एम. के. मानकर, लेडीज पोलीस कांस्टेबल उज्वला तायडे हे घटनास्थळी दाखल झाले. परंतु पोलीस घटनास्थळी येत असल्याची चाहूल विद्यार्थ्यांना लागल्याने त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलिसांना तेथून एका विद्यार्थिनीसह दोन युवकांना ताब्यात घेण्यात यश आले.
वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: The police raid on 'Rev Party'