शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:22 IST

पतंग काढण्यासाठी शेताच्या कुंपणाच्या तारांना स्पर्श करताच जोरात विजेचा धक्का लागला आणि

सचिन गुरनुले मृत्यूप्रकरण : विजेच्या धक्क्याने झाला मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क मौदा/कोदामेंढी : पतंग काढण्यासाठी शेताच्या कुंपणाच्या तारांना स्पर्श करताच जोरात विजेचा धक्का लागला आणि त्यात शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना मौदा तालुक्यातील कोदामेंढी येथे शनिवारी सायंकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी अरोली पोलिसांनी शेतमालक पोलीस पाटलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सचिन संतोष गुरनुले (१४, रा. कोदामेंढी, ता. मौदा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव तर प्रकाश देवतळे, रा. कोदामेंढी असे अटक करण्यात आलेल्या शेतमालक पोलीस पाटलाचे नाव आहे. सचिन त्याच्या मित्रांसोबत सूर नदीच्या तीरावर खेळण्यासाठी गेला होता. त्याची कटलेली पतंग जवळच असलेल्या पोलीस पाटील प्रकाश देवतळे यांच्या शेताच्या ताराच्या कुंपणात अडकल्याने सचिन ती पतंग काढण्यासाठी गेला. त्याने कुंपणाला स्पर्श करताच जोरात विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कुंपणाच्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने प्रकाश देवतळे यांच्याविरुद्ध भादंवि ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. पिकांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे काहींनी सांगितले. सचिन कोदामेंढी येथील जिल्हा परिषद विद्यालयात नवव्या वर्गात शिकायचा. त्याचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्याला बहीण व भाऊ आहे. रविवारी दुपारी स्थानिक स्मशानभूमीत सचिनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिनच्या वडिलांची गरिबीची परिस्थिती पाहता सदर प्रकरण दडपले तर जाणार नाही ना, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.