नायलॉन मांजावर पोलिसांची बंदी

By Admin | Updated: January 8, 2015 01:25 IST2015-01-08T01:25:05+5:302015-01-08T01:25:05+5:30

धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाच्या वापरावर पोलिसांनी अंकुश आणला आहे. यासंबंधात सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी ८ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान नायलॉन

Police ban on nylon mens | नायलॉन मांजावर पोलिसांची बंदी

नायलॉन मांजावर पोलिसांची बंदी

सहपोलीस आयुक्तांचा आदेश : वापर करणाऱ्यावर होणार कारवाई
नागपूर : धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाच्या वापरावर पोलिसांनी अंकुश आणला आहे. यासंबंधात सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी ८ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश बजावला आहे. यादरम्यान कुणी पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर केल्यास त्याच्यावर कलम १८८ भादंवि प्रमाणे कार्यवाही केली जाईल, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
मकरसंक्रांतीचा सण हा नागपूर शहरातही मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची खरेदी-विक्री केली जाते. नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनवला जातो. त्यामुळे नायलॉन मांजा सहसा तुटत नाही व काही वर्षे तसाच राहतो.
या मजांच्या वापरामुळे गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. अनेकांचे गळे चिरले जातात, नाक, कान व गालावर गंभीर जखमा होतात. रस्त्याने जात असलेल्या दुचाकी वाहन नायलॉन मांजात अडकून गंभीर अपघाताला बळी पडतात. अशा प्रकारे नायलॉन मांजा नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका निर्माण करतो. तसेच नायलॉन मांजा झाडावर, विद्युत खांबावर, रस्त्यावर तसाच अडकून राहतो. त्यामुळे पर्यावरणासही धोका उत्पन्न होतो. त्यामुळे नायलॉन मांजाच्या वापरावर शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास पुरेसे कारण असल्याने मानवी जीवितहानी व आरोग्यास होणारी हानी टाळण्यासाठी मकरसंक्रांती सणाच्या कालावधीत नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police ban on nylon mens