शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आकाशच्या तुकड्या कुटीत भरतात संस्काराचे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:07 IST

चिमुकल्यांना मिळतेय महाराजांच्या ग्रामगीतेची शिकवण : सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व घडविण्याचा ध्यास नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून आदर्श ग्राम, सुसंस्कारित ...

चिमुकल्यांना मिळतेय महाराजांच्या ग्रामगीतेची शिकवण : सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व घडविण्याचा ध्यास

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून आदर्श ग्राम, सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व घडविण्याचा उपदेश दिला आहे. महाराजांच्या विचारांचा पाईक असलेल्या आकाश टाले या पंचवीशीतील युवकाने महाराजांचे विचार आत्मसात करीत ते कृतीतून उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. वाठोड्यातील भारतीय लोककल्याण सोसायटीत त्याने ‘तुकड्या कुटी’ निर्माण करून परिसरातील लहानग्यांमध्ये तुकडोजी महाराजांचे विचार तो पेरतोय.

आकाशच्या या तुकड्या कुटीला ग्रामीण लूक आहे. बांबूच्या झांझ्या, तट्टे, तुराट्यांपासून ही कुटी तयार केली आहे. कुटीच्या समोर हिरवळ तयार करून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे पात्र आकाश कंदीलासारखे लटकविलेले आहे. शेणाने सारवलेली बैठक व्यवस्था असली तरी मार्कर पेनचा वापर करणारा फळा आहे. चिमुकल्यांनी रंगविलेल्या भिंती आणि ४० डिग्रीतही मिळणारा नैसर्गिक गारवा असे कुतूहल निर्माण करणाही ही कुटी आहे. आकाशने नुकतीच इन्स्टिट्युट ऑफ सायन्स येथून बीएस्सी केले आणि आता तो बीएड करीत आहे. तो ग्रामीण भागातील असला तरी गेल्या काही वर्षांपासून तो शहरी वातावरणातच जगतो आहे. पण आकाशवर तुकडोजी महाराजांच्या विचारांचा पगडा आहे. हे विचार तो कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आकाश हा सप्तखंजिरीवादक आहे. ग्रामीण भागात सामाजिक विषयांवर तो जाहीर कार्यक्रमही करतो.

हे करीत असताना आकाशने परिसरातील बालकांसाठी संस्कार शाळा सुरू केली. तीसुद्धा या ताट्यांच्या कुटीत. दररोज सायंकाळी ६ ते ८ या कुटीत संस्काराचे वर्ग भरतात. दररोज सामुदायिक प्रार्थना घेतली जाते. मुले रमावीत म्हणून सांस्कृतिक उपक्रम, बोधकथा, ग्रामगीतेच्या काही ओळी, थोडावेळ खेळ आणि शालेय अभ्यास असा एक उपक्रम दररोज चालतो. दोन वर्षापासून आकाशच्या या कुटीत बच्चेकंपनी रमायला लागली आहे.

- सामाजिक उपक्रमातून प्रबोधन

मुलांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात. स्वच्छतेची कास मुलांनी धरावी म्हणून परिसर स्वच्छता, कुटी स्वच्छता मुलांकडून केली जाते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक वाढदिवस एक वृक्ष असा उपक्रम राबविण्यात येतो. संत, महात्म्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते.

- मुलांना स्टेज डेअरिंग यावे, मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, ती संस्कारित व्हावी या विचारातून ही तुकड्या कुटी निर्माण केली आहे. भविष्यात कुटीचे भवन व्हावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा आधार व्हावा, हीच अपेक्षा आहे.

आकाश टाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा उपासक