शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुट्या नोटांसाठी रुग्णांची धावाधाव

By admin | Updated: November 14, 2016 03:07 IST

चार दिवस होऊनही इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय

नागपूर : चार दिवस होऊनही इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ५०० व १००० नोटा घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना सुट्या नोटांसाठी परत पाठविले जात आहे. परिणामी, तातडीची ईसीजी करण्यापासून ते एमआरआयची गरज असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना सुट्या पैशांच्या जमवाजमावीसाठी धावाधाव करावी लागत आहे. चलनातून ५०० व १०००च्या नोटा रद्द झाल्याने याचा सर्वाधिक फटका सामान्य रुग्णांना बसत आहे. मेयो, मेडिकलमध्ये गंभीर रुग्ण असलातरी शुल्क भरल्यावरच त्याच्यावर उपचार होतो. परिचारिकांपासून ते डॉक्टरही शुल्क भरल्याची पावती पाहूनच एक्स-रे ते सोनोग्राफीसाठी आत प्रवेश देतात. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये पैसे भरण्यासाठी एकच खिडकी आहे. ही खिडकी शल्यक्रिया विभागाच्या अपघात विभागात आहे. येथे आधीच शुल्क भरणाऱ्यांची रांग लागलेली असते. यातच ५०० व १०००च्या नोटा स्वीकारत नाही. यामुळे कुठूनतरी सुट्या नोटा मिळविल्यातर पुन्हा रांगेत लागावे लागते. परिणामी, रुग्णाला उपचार मिळण्यास उशीर होतो. शनिवारी अनेक रुग्णांना सुट्या नोटांच्या नावाखाली परत पाठविण्यात आल्याची माहिती आहे. चार दिवसानंतरही सुट्या नोटा मिळत नसल्यामागे राजकारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)