शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धची याचिका खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 20:57 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धची एक फौजदारी रिट याचिका खारीज केली.

ठळक मुद्देमोठा दिलासा मिळालाहायकोर्टाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धची एक फौजदारी रिट याचिका खारीज केली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला.अ‍ॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली होती. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी नामनिर्देशनपत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी प्रकरणांचा उल्लेख केला नाही. ती माहिती त्यांनी जाणिवपूर्वक लपवून ठेवली. तसेच, त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्रावर २६ सप्टेंबर २०१४ रोजी स्वाक्षरीही केली. त्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे २ ऑक्टोबर २०१४ रोजी तक्रार केली, पण पुढे विशेष काहीच झाले नाही. त्यामुळे फडणवीस यांच्याविरुद्ध लोक प्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १२५-ए व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९५ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत असे उके यांचे म्हणणे होते. उके यांनी स्वत: याचिकेचे कामकाज पाहिले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यातर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व अ‍ॅड. नीरजा चौबे तर, फडणवीस यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस