कंत्राटदारांना स्थायी समितीचा धक्का

By Admin | Updated: January 5, 2017 02:05 IST2017-01-05T02:05:12+5:302017-01-05T02:05:12+5:30

शहरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु बाजूच्या रस्त्याला जोडणारा भाग समतल न करता तसाच सोडला जात आहे.

Permanent committee push to contractors | कंत्राटदारांना स्थायी समितीचा धक्का

कंत्राटदारांना स्थायी समितीचा धक्का

नादुुरुस्त सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती करणार
नागपूर : शहरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु बाजूच्या रस्त्याला जोडणारा भाग समतल न करता तसाच सोडला जात आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक सुरेश जग्याशी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित कंत्राटारांकडून करण्याचे आश्वासन देण्यात आले.
सिमेंट रस्ते की अपघाताला निमंत्रण, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. स्थायी समितीच्या बैठकीत या वृत्ताची गंभीर दखल घेण्यात आली. शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे नागरिकांच्या सुविधेसाठी केली जात आहेत की, अपघाताला निमंत्रण देण्यासाठी असा प्रश्न जग्याशी यांनी उपस्थित केला. मॉडेल मिल ते गणेशपेठ दरम्यानच्या सिमेंट रस्त्याचे काम युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीने केले आहे. परंतु दोन रस्त्यांची जोडणी करण्याचे काम आमचे नसल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. निविदातील अटी व शर्तीत त्रुटी ठेवण्याला जबाबदार कोण असा जाब विचारून संबंधित रस्ता समतल करण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असल्याची जाणीव करून देण्यात आली.
स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी याची दखल घेत मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांना बोलावून विचारणा केली. त्यांनी अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
तीन दिवसात ही कामे संबंधित कंत्राटदारांकडून पूर्ण केली जातील, अशी ग्वाही देबडवार यांनी बैठकीत दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Permanent committee push to contractors