शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरांच्या मतदार यादीत महिलांचा टक्का कमी

By admin | Updated: May 14, 2014 00:09 IST

प्रसिद्ध झालेल्या पदवीधर मतदारांच्या यादीत २ लाख ७७ हजार ७४ मतदार असले तरी त्यात महिलांचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज ...

नागपूर : प्रसिद्ध झालेल्या पदवीधर मतदारांच्या यादीत २ लाख ७७ हजार ७४ मतदार असले तरी त्यात महिलांचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी व्यक्त केली.

सांख्यिकी विभागाकडे असलेली पदवीधर महिलांची संख्या आणि मतदार यादीतील महिलांचे स्थान यात तफावत आहे. ती दूर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. एकूण पदवीधर महिलांपैकी नागपूरमध्ये ३६ टक्के, वर्धा ३८ टक्के, चंद्रपूर २४ टक्के, भंडारा २४ टक्के, गोंदिया ३९ टक्के आणि गडचिरोलीत फक्त २१ टक्के महिलांनीच नोंदणी केली आहे. ही संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन आयुक्तांनी राजकीय पक्षांना केले आहे. विशेषत: गृहिणी त्यांचे नाव नोंदविण्यासाठी उत्सुक नसतात. विवाहानंतर नाव बदलल्यानेही अनेकांची अडचण होते. विवाहित महिलांनी नाव नोंदविताना शपथपत्र देणे गरजेचे आहे. यासाठी राजकीय पक्षांनी जनजागृती करून जास्तीतजास्त महिला पदवीधरांची नोंदणी करून घ्यावी, असे आयुक्त म्हणाले.

नाव नोंदविण्यासाठी हे करावे लागेल

ग्रामीण भागात तहसील व उपविभागीय कार्यालय व शहरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयातून अर्ज क्र. १८ घेऊन तो भरणे, सोबत पदवी किंवा पदविकेच्या दोन छायांकित प्रती, निवासाचा पत्ता, दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे जोडून ती उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी. विवाहानंतर महिलांचे नाव बदलले असेल तर त्यांना त्यासाठी शपथपत्र सादर करावे लागेल. नोंदणी अर्ज पुरेसे उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

मतदारांनाच करावी लागणार खात्री

मतदार यादीत नाव आहे किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी ही मतदारांचीच आहे. मतदार पदवीधर असल्याने त्यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन याबाबत खात्री करून घ्यावी, यासाठी वेगळी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार नाही. राजकीय पक्षांनी यासाठी काही प्रयत्न करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. (प्रतिनिधी)