जनतेत जागरूकता हवी

By Admin | Updated: June 13, 2014 01:30 IST2014-06-13T01:30:55+5:302014-06-13T01:30:55+5:30

सरकारकडून कामे करून घेण्याची जागरूकता जनतेत असायला हवी, असे सरसंघचालक यावेळी म्हणाले. शिवाजी महाराजांना सामान्य माणसांनी राजा केले. गुणवत्तापूर्ण समाज शासकाकडून कामे करवून घेऊ शकतो.

People need awareness | जनतेत जागरूकता हवी

जनतेत जागरूकता हवी

नागपूर : सरकारकडून कामे करून घेण्याची जागरूकता जनतेत असायला हवी, असे सरसंघचालक यावेळी म्हणाले. शिवाजी महाराजांना सामान्य माणसांनी राजा केले. गुणवत्तापूर्ण समाज शासकाकडून कामे करवून घेऊ शकतो. सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘जे जे उन्नत उदात्त, मंगल...’ या ध्येयपूर्तीसाठी क्रांतिकारकांनी वातावरण निर्माण केले. पण स्वातंत्र्यानंतर देशाचा ठेका देऊन आम्ही झोपी गेलो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या तिजोरीत ३३ हजार कोटी होते आणि १६ हजार कोटी रुपये वसूल करायचे होते. पण तत्कालीन नेत्यांनी दिशाच दिली नाही आणि उष:काल होता होता काळरात्र झाली.
आजही देशासाठी बलिदान करण्याची वेळ आली तर स्वयंसेवक बलिदान करतील, पण आज देशासाठी जगण्याची वेळ आहे. संघ शाखा ही सामूहिक विचारांची तपस्या आहे. यातूनच भारत विश्वगुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: People need awareness