शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

फूटपाथवरील अतिक्रमणे हटविली, सहा ट्रक साहित्य जप्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील १० झोनमध्ये गुरुवारी ४०० पेक्षा अधिक अतिक्रमणधारकांना हटविण्याची कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनमध्ये ...

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील १० झोनमध्ये गुरुवारी ४०० पेक्षा अधिक अतिक्रमणधारकांना हटविण्याची कारवाई केली.

लक्ष्मीनगर झोनमध्ये रहाटे कॉलनी चौक ते लक्ष्मीनगर चौक, सोमलवाडा चौक ते रहाटे कॉलनी चौकापर्यंतची ५२ अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत सिव्हिल लाईन्सच्या मिठा निम दरगाह ते लागूनच असलेल्या फूटपाथवरील अतिक्रमणधारकांचे शेड हटविण्यात आले. त्यानंतर आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय व व्हिसीए मैदानापर्यंत कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण धारकांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयासमोरील फूटपाथवरून चहाची दुकाने आणि ठेले हटविण्यात आले. या दुकानदारांकडून ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत तिरंगा चौक ते सक्करदरा चौकापर्यंत अतिक्रमण करणाऱ्यांचे एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा चौकापर्यंत फूटपाथवरील ५६ अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत त्रिशरण चौक ते नरेंद्रनगर चौक, मनिषनगर चौक ते तुकडोजी पुतळा चौक आणि वंजारीनगर चौक, कॉटन मार्केट ते सुभाषनगर, मेडिकल चौक ते टीबी वॉर्ड चौकातील ७२ अतिक्रमणे हटविण्यात आली. या भागातही एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. वसंतनगरात संजय मुरमोरे यांची रस्त्यापर्यंत असलेली भिंत पाडण्यात आली.

.................