शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

जाती व्यवस्था व असमानता दूर केल्याशिवाय शांतता अशक्य

By admin | Updated: May 13, 2014 00:54 IST

समाजातून जाती व्यवस्था आणि असमानता दूर होत नाही तोपर्यंत सरकार कोणाचेही असो देशात शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन विख्यात लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांनी येथे केले.

नागपूर : समाजातून जाती व्यवस्था आणि असमानता दूर होत नाही तोपर्यंत सरकार कोणाचेही असो देशात शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन विख्यात लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांनी येथे केले.

इंडिया पीस सेंटर आणि हिस्लॉप कॉलेज, दीनबंधू शिक्षण संस्था आणि सत्यशोधक इंटरनॅशनल यांच्या संयुक्तवतीने अरुंधती रॉय यांचे हिस्लॉप कॉलेजच्या सभागृहात ‘प्रॉस्पेक्टस् ऑफ पीस इन पोस्ट पोल इंडिया’ (निवडणुकीनंतर भारतातील शांततेचे भवितव्य) या विषयावर भाषण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना व घडामोडींचा हवाला देत रॉय यांनी त्यांचे वरील मत मांडले. जात नष्ट केल्याशिवाय शांतता निर्माण होणारच नाही. देशात निर्माण झालेली विषमता हे सुद्धा यासाठी महत्त्वाचे कारण आहे. आज समाजात मूठभर लोकांची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली असून, समाजातील मोठा वर्ग गरीब होत चालला आहे. श्रीमंत मूठभर वर्गाकडे देशातील संपूर्ण शक्ती केंद्रित झाली आहे. देशाची धोरणे काय असावीत, कोण सत्तेवर यावे, हे तेच लोक ठरवू लागले आहेत. सर्वसामान्य जीवनातील प्रत्येक गोष्टीवर ते त्यांचे वर्चस्व निर्माण करू पाहात आहे, हे धोक्याचे आहे व ते थांबविण्याची गरज आहे, असे रॉय म्हणाल्या.

अयोध्येतील वादग्रस्त वास्तूचे दार उघडणे आणि खुल्या अर्थव्यवस्थेला परवानगी देणे, या दोन बाबींमुळे संपूर्ण देशातील वातावरणच बिघडले. देश जातीयतेसोबतच असमानतेच्या खाईत लोटल्या गेला. त्यातून निर्माण झालेला द्वेष आणि असमानता अद्यापही कायम आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकशाहीत फक्त निवडणुकाच महत्त्वाच्या नसतात तर लोकांच्या प्रश्नांनाही महत्त्वाचे स्थान असते. आजही भारतासारख्या विशाल देशात कुपोषण आहे. दलित आणि आदिवासींवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे. या लोकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांतता कशी नांदेल, असा सवालही त्यांनी केला. व्यासपीठावर रॉजर गायकवाड, सुरेश खैरनार आणि सुनील सरदार उपस्थित होते. त्यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास झाला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुपंथ भट्टाचार्य यांनी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)