शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भागीदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: March 1, 2015 02:31 IST

रायपूर येथील एका व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने आरोपी भागीदाराचा ...

नागपूर : रायपूर येथील एका व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने आरोपी भागीदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तर अन्य तीन आरोपींना जामीन मंजूर केला. राजेंद्रकुमार भीमराज जैन (४७), असे आरोपी भागीदाराचे नाव आहे. विकास रामचंद्र जैन, पंकज राजनकुमार जैन आणि विकास शिवकुमार सिंग सर्व रा. रायपूर, अशी अटकपूर्व जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. आनंद मधुकर संगमनेरकर (४९), असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून ते रायपूर येथीलच रहिवासी होते. त्यांनी नागपुरातील अग्रवाल लॉजमध्ये चिठ्ठी लिहून ३० नोव्हेंबर २०१४ रोजी नागपूर रेल्वेस्थानक येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याने आरोपींची नावे लिहून ठेवली होती. त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत, असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. पुढे आनंद संगमनेरकर यांच्या पत्नी कल्याणी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून नागपूर रेल्वेस्थानक पोलिसांनी चौघांविरुद्ध भादंविच्या ३०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरण असे की, रायपूर येथील उषा रेकॉन सेंटर नावाच्या फर्ममध्ये आनंद संगमनेरकर आणि राजेंद्रकुमार जैन यांची भागीदारी होती. या फर्मचे संपूर्ण मालकी हक्क आपणाकडे यावे या हेतूने आरोपी राजेंद्रकुमार जैन हा अन्य सहकाऱ्याच्या मदतीने संगमनेरकर यांचा वेळोवेळी छळ करायचा, त्यांना अपमानित करायचा, चेकबुक आणि ड्रॉवरच्या चाव्याही त्यांनी हिसकावून घेतल्या होत्या. नवरात्रीच्या काळात दिवसभर कार्यालयात डांबूनही ठेवले होते. परिणामी या छळाला कंटाळून संगमनेरकर यांनी आत्महत्या केली होती. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. जे. एम. गांधी यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गोविंद मदने हे आहेत. (प्रतिनिधी)