शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पावसाळी नाल्यांची सफाई अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 02:09 IST

शहरातील पावसाळी नाल्या, गडर लाईन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात शहरातील चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेल्या पावसाळी नाल्यापैकी जेमतेम ३६९ किलोमीटर लांबीच्या पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढण्यात आला आहे. गडर लाईनचीही कामे अर्धवट आहेत.

ठळक मुद्देनगरसेवकांच्या सूचनेनंतरही सफाई नाही: पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोव्हिड-१९ चा ससर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने मागील अडीच महिन्यापासून शहरातील बाजारपेठ, दुकाने बंद होती. रस्त्यावर वर्दळ नसल्याने कचऱ्याचे प्रमाण घटल्याने सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून शहरातील पावसाळी नाल्या, गडर लाईन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात शहरातील चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेल्या पावसाळी नाल्यापैकी जेमतेम ३६९ किलोमीटर लांबीच्या पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढण्यात आला आहे. गडर लाईनचीही कामे अर्धवट आहेत.प्रभाग क्रमांक ३० मधील पावसाळी नाल्यातील कचरा व गाळ काढला जावा, यासाठी प्रभागाचे नगरसेक संजय महाकाळकर यांनी झोन अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या, परंतु अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. अशीच अवस्था अन्य प्रभागातील आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाल्या गाळ व कचऱ्यामुळे तुंबलेल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात वस्त्यात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे.महापौर व आयुक्तांनी आढावा बैठकीत पावसाळ्यापूर्वी नाल्या व गडर लाईन साफ करण्याचे निर्देश दिले होते. परंतु झोनस्तरावर या निर्देशाची अंमलबजावणी होत नाही. नगरसेवकांनी प्रभागातील तुंबलेल्या नाल्या साफ करण्यास सांगितल्यानंतरही प्रभाग ३० मधील कामे सुरू झालेली नाही, अशी माहिती संजय महाकाळकर यांनी दिली.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नागपुरातील तीन नद्या, शहरातील नाले आणि पावसाळी नाल्यांची सफाई करण्यात येते. यावर्षी काम वेळेआधी सुरू करण्यात आले असले तरी पावसाळी नाल्याची सफाई झालेली नाही. नाल्याची कामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. पण दहा दिवस झाले तरी परिस्थितीत सुधारणा झालेली नाही, अशी नगरसेवकांची तक्रार आहे.पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोकाशहरातील पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढण्याची कामे अर्धवट आहेत. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका आहे. पावसाला सुरुवात झाल्यास गाळ काढणे शक्य न झाल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या