कागदी बंडल टोळीचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:08 IST2021-01-23T04:08:38+5:302021-01-23T04:08:38+5:30

------ वृद्धाचा मृतदेह आढळला नागपूर - भीमसेन बयाराम लांजेवार (वय ७२, रा. लष्करीबाग) यांचा मृतदेह संत्रा मार्केट रामझुला येथे ...

Paper bundle gang dude | कागदी बंडल टोळीचा धुडगूस

कागदी बंडल टोळीचा धुडगूस

------

वृद्धाचा मृतदेह आढळला

नागपूर - भीमसेन बयाराम लांजेवार (वय ७२, रा. लष्करीबाग) यांचा मृतदेह संत्रा मार्केट रामझुला येथे गुरुवारी सायंकाळी आढळून आला. मिळालेल्या सूचनेवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

पारडीत घरफोडी

रोकड, दागिने लंपास

नागपूर - शिवनगर हनुमान मंदिराजवळ राहणारे दीपक मन्नू सनोडिया (वय २४) यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ४५ हजार तसेच सोन्याचे दागिने चोरून नेले. गुरुवारी (दि. २१) पहाटे पाचच्या सुमारास ही घरफोडीची घटना उघडकीस आली. सनोडिया सहपरिवार १९ जानेवारीला बाहेरगावी गेले होते. गुरुवारी परत आले तेव्हा त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी रोख ४५ हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण दीड ते पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. सनोडिया यांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

.......................................

Web Title: Paper bundle gang dude