शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समित्या उधारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

नागपूर : ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेतील दुवा म्हणविल्या जाणाऱ्या पंचायत समित्या फक्त नावापुरत्याच आहेत. राजकीय कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी, त्यांना सन्मानाचे ...

नागपूर : ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेतील दुवा म्हणविल्या जाणाऱ्या पंचायत समित्या फक्त नावापुरत्याच आहेत. राजकीय कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी, त्यांना सन्मानाचे पद मिळावे म्हणून पंचायत समितीची यंत्रणा कार्यान्वित केली असावी, असा समज पं.स.च्या आजी-माजी सदस्यांचा आहे. उत्पन्नाचे कुठलेही स्रोत नाहीत, सभापती, उपसभापतींना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. जिल्हा परिषदेकडून येणारा ठराविक सेस व वित्त आयोगाचा निधी हेच पंचायत समितीचे स्रोत आहे.

१ लाख लोकसंख्येसाठी व १०० ते १२५ खेड्यांसाठी एक विकासगट समिती म्हणून पंचायत समिती गठित केली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाच्या माध्यमातून ज्या योजना राबविल्या जातात, त्या योजनांचे तालुकास्तरावर नियंत्रण ठेवणारी ही यंत्रणा आहे. गावातील नागरिकांना प्रत्येक कामासाठी जिल्हा परिषदेत न येता, ते काम तालुकास्तरावर असलेल्या पंचायत समितीच्या माध्यमातून करू शकतात. पंचायत समिती या यंत्रणेवर निवडून आलेल्या सदस्यांतून सभापती व उपसभापती ही दोन महत्त्वाची पदे बहाल केली आहेत; पण या पदांना कुठलेही प्रशासकीय अधिकार नाहीत. केवळ यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सभापती व उपसभापतींना आहे. १३ व्या वित्त आयोगातून पंचायत समितीला २० टक्के निधी दिला गेला. १४ व्या वित्त आयोगात थेट ग्रामपंचायतीला निधी दिल्याने पंचायत समित्या कामाच्याच नव्हत्या. आता १५ व्या वित्त आयोगातून १० टक्के निधी पंचायत समितीला देण्याचा निर्णय घेतला आहे. या १० टक्के निधीचे नियोजन एवढेच काम पंचायत समितीचे आहे. पंचायत राज व्यवस्थेने ग्रामपंचायतीच्या सदस्यांना जे अधिकार बहाल केले आहेत ते सभापती म्हणून पंचायत समितीला नाहीत. पंचायत समितीचे स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत नसल्याने या यंत्रणेवर निवडून आलेले सदस्य केवळ नावाचेच आहेत.

- आमच्या पंचायत समितीच्या तालुक्यात काही जागा आहे. त्यावर अतिक्रमण झाले आहे. सभापती म्हणून त्या जागा ताब्यात घेऊन त्यातून पंचायत समितीचे उत्पन्न वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे; पण पंचायत समितीचा सभापती म्हणून मला अधिकारच नाही. पंचायत समितीमार्फत जी कामे होतात, त्या कामासाठी विचारणाही होत नाही. आमचे फक्त आढावा घेण्याचे काम आहे. पंचायत समितीवर निवडून आलेल्या यंत्रणेला अधिकार द्यावेत, अशी आमची मागणी आहे.

दादा भिंगारे, सभापती, पं.स., कळमेश्वर

- पंचायत समितीवर जे सदस्य निवडून जातात. ते केवळ बैठकीपुरते मर्यादित असतात. विशेष म्हणजे तालुक्यातील लोक पंचायत समितीला अटॅच असतात. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र योजना पंचायत समिती स्तरावर राबविता येत नाही. सर्व काही जिल्हा परिषदेवर अवलंबून राहावे लागते. राजकीय कार्यकर्त्यांना मान मिळावा म्हणून हे पद आहे.

राजू हरणे, माजी सभापती