शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पीएसीएल कंपनीने कार्यालयाला कुलूप ठोकले

By admin | Updated: May 24, 2015 03:00 IST

पीएसीएल कंपनीच्या व्यवस्थापनाने १२ मेपासून नागपुरातील कार्यालयाला कुलूप ठोकले आहे.

नागपूर : पीएसीएल कंपनीच्या व्यवस्थापनाने १२ मेपासून नागपुरातील कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. शिवाय फिल्ड असोसिएट व ग्राहकांशी संपर्क बंद केला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, काही लोकांनी कार्यालयाची तोडफोडसुद्धा केली आहे. पीएसीएल ही देशातील एक नामांकित कंपनी असून, या कंपनीत करोडो ग्राहकांनी आपल्या परिश्रमाची जमापुंजी जमा केली असल्याची माहिती राम वाघ यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ते म्हणाले, कंपनीने लाखो एजंट व कोट्यवधी ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. मागील तीन वर्षांपासून कंपनीची स्थिती फारच डामाडौल झाली आहे. मात्र तरीही फिल्ड असोसिएट आजपर्यंत कंपनीच्या हितासाठी ग्राहकांची समजूत घालून त्यांच्यामध्ये विश्वासाची भावना निर्माण करीत होते. मात्र कंपनीने मागील एक वर्षापासून ग्राहकांना मॅच्युरिटी दिलेली नाही. त्यासाठी ग्राहक दारोदारी भटकंती करीत आहे. दुसरीकडे कंपनी व्यवस्थापन कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. अधिकारी फोनसुद्धा घेत नाही. यामुळे फिल्ड असोसिएटचा जीव धोक्यात सापडला आहे. तरी कंपनी व्यवस्थापनाने ग्राहक व फिल्ड असोसिएटचे लवकरात लवकर समाधान करावे, अन्यथा ५ जून रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. पत्रपरिषदेला रंजित मित्रे, गजानन देउळकर व प्रीती बुजाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)