शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनची पाइपलाइन झाली होती निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:11 IST

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद ...

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद झाल्याने एकामागे एक तीन रुग्णांचा मृत्यूच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. मेडिकल प्रशासनाने चार सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीला सुरुवात केली. सोबतच ऑक्सिजन गॅस प्लँटची थर्ड पार्टीकडून तपासणी करण्याचेही निर्देश दिले. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वी ट्रॉमा केअर सेंटरची ऑक्सिजन पाइपलाइन निकामी होऊन गळती लागली होती. त्याचे छायाचित्र ‘लोकमत’ला प्राप्त झाल्याने या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शिशू अतिदक्षता विभागातील १० चिमुकल्यांचे बळी जाण्याचे प्रकरण ताजे असतानाच मेडिकलच्या या घटनेने शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरचा ‘अतिदक्षता विभाग-१’मध्ये (आयसीयू) रविवारी पहाटे साधारण अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. यामुळे अर्ध्या-अर्ध्या तासाच्या कालावधीत तीन गंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सूत्रांनुसार, नरेश मून (६३), रा. वॉर्ड क्र. १, महादुला यांचा पहाटे ६ वाजता, शिवरत्न शेंडे (५६), रा. सिद्धार्थनगर कोरोडी यांचा ६.३० वाजता, तर अमोल नाहे (२४), रा. संग्रामपूर, बुलडाणा यांचा ७ वाजता मृत्यू झाला. अचानक झालेल्या या मृत्यूने डॉक्टर व परिचारिकांमध्ये धावपळ उडाली. यात ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याचे सामोर आले. याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांना देण्यात आली. तातडीने उपाययोजना केल्याने उर्वरित सहा रुग्णांचे प्राण वाचले.

या धक्कादायक घटनेला ‘लोकमत’ने सामोर आणताच खळबळ उडाली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेत सखोल चौकशी करण्याचा सूचना दिल्या, तसेच सोमवारी दिवसभरातील घडामोडींचा अहवाल सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्यासही सांगितले.

दरम्यान ‘लोकमत’कडे या घटनेच्या तीन दिवसांपूर्वीचा ऑक्सिजन पाइपलाइन निकामी झाल्याचा फोटो सूत्राने उपलब्ध करून दिला. प्राप्त माहितीनुसार, एका सुरक्षा रक्षकाला ऑक्सिजनला गळती लागल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली होती.

-डॉ. सुशांत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती

मेडिकल प्रशासनाने ‘लोकमत’ला दिलेल्या पत्रानुसार अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी आज ‘आयसीयू-१’ची पाहणी केली. यात त्यांना ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊन रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले नसल्याचे सांगितले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पल्मनरी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. यात सदस्य सचिव वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, सदस्य म्हणून मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील व बधिरीकरण विभागाचे प्रमुख वासुदेव बारसागडे यांचा समावेश आहे. ट्रॉमा केअर सेंटरमधील ऑक्सिजन गॅस प्लँटची तपासणी थर्ड पार्टीकडून करण्याचा व अहवाल १२ तासांत देण्याचे आदेशही देण्यात आले.

- ५५ ते ६६ टक्क्यांदरम्यान होते रुग्णांच्या ऑक्सिजनचे प्रमाण

मेडिकलने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी होते. नरेश मून यांचे ५७ टक्के (रूम एअरवर), अमोल नाहे यांचे ६६ टक्के (हाय फ्लो ऑक्सिजनवर), तर शिवराम शेंडे यांचे ५५ टक्के (रूम एअरवर) ऑक्सिजन होते. रुग्णांची प्रकृती अतिगंभीर होती.

-निष्पक्ष चौकशी होणार का?

एखाद्या घटनेची चौकशी झाली आणि दोषींवर कारवाई झाली, अशी घटना मेडिकलच्या इतिहासात क्वचितच घडली आहे. यामुळे या घटनेची तरी निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे चौकशी समितीमध्ये मेडिकलच्याच डॉक्टरांचा समावेश आहे. यामुळे मेडिकलच्या बाहेरील सदस्यांकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही होत आहे.

-रिपब्लिकन आघाडीकडून पालकमंत्र्यांना निवेदन

‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊन तीन रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची दखल रिपब्लिकन आघाडीनेही घेतली. पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन सखोल चौकशी करण्याची व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात दिनेश अंडरसहारे, संजय पाटील, सुनील जवादे, चरणदास पाटील व दीपक वालदे आदींचा समावेश होता.