शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

उद्या ७ हजारांवर औषधी दुकाने राहणार बंद; ऑनलाइन औषधी विक्रीला विरोध

By सुमेध वाघमार | Updated: May 18, 2026 19:15 IST

Nagpur : ऑनलाइन आणि इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या व्यवसायाविरोधात 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट' या संघटनेने बुधवार, २० मे रोजी देशभरातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांना बंदचे आवाहन केले आहे.

सुमेध वाघमारे
नागपूर :
ऑनलाइन आणि इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या व्यवसायाविरोधात 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट' या संघटनेने बुधवार, २० मे रोजी देशभरातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांना बंदचे आवाहन केले आहे. नागपूर शहर व ग्रामीणमधील जवळपास ७ हजारांवर औषधी दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णसेवा अडचणीत येणार असल्याने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) ‘अलर्ट’वर असून नामांकित फार्मसी सुरू ठेवण्याची उपाययोजना केली आहे.

नागपूर एफडीएने औषध विक्रेता संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत तातडीने बैठक घेऊन जनहित लक्षात घेता बंदमध्ये सहभागी न होण्याची विनंती केली आहे. तसेच, जिल्ह्यातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांशी वैयक्तिक स्तरावरही संपर्क साधला जात आहे. प्रशासनाच्या सूचनेनंतर संपाच्या दिवशी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही औषध दुकाने सुरू ठेवण्याबाबत संघटनेने सहमती दर्शविली आहे.

'ही' औषध दुकाने नियमित सुरू राहणार

नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना औषधांसाठी भटकंती करावी लागू नये म्हणून प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. संप काळातही नामांकित फार्मसी साखळ्यांची दुकाने नेहमीप्रमाणे नियमित सुरू राहतील. यात मेडप्लस, अपोलो फार्मसी, वेलनेस फॉरएव्हर यांच्या जवळपास १००वर औषधी दुकाने सुरू राहण्याची शक्यता आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीत 'या' क्रमांकांवर साधा संपर्क

औषधांची तातडीची गरज भासल्यास नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता थेट अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक स्वाती भरडे, ९८९०८२८१९४, प्रशांत रामटेके ९०२८६७००२४, अभिषेक चवरडोल ८८९७९४०९८१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

गरज पडल्यास थेट औषध निरीक्षकांशी संपर्क साधा

"नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तातडीच्या आणि आणीबाणीच्या परिस्थितीत औषधांच्या गरजेसाठी प्रशासनाने दिलेल्या क्रमांकांवर थेट संपर्क साधावा."
- मनिष चौधरी, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नागपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Chemists to Strike Against Online Pharmacies; Medicine Supply May Be Affected

Web Summary : Nagpur chemists will strike against online pharmacies on May 20th. Around 7,000 shops may close, potentially disrupting patient care. FDA is on alert, ensuring major pharmacies stay open. Contact FDA officials for urgent medicine needs.
टॅग्स :Medicalवैद्यकीयnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र