शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

आदेशाचे उल्लंघन, वॉरंट जारी

By admin | Updated: January 16, 2015 00:57 IST

व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश न पाळल्यामुळे पिंपळगाव (ता. बाळापूर, अकोला) येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष भीमराव पटोले

हायकोर्ट : पाणी पुरवठा समिती अध्यक्षाला दणका
नागपूर : व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश न पाळल्यामुळे पिंपळगाव (ता. बाळापूर, अकोला) येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष भीमराव पटोले यांच्याविरुद्ध हायकोर्टाने १० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.
सार्वजनिक विहिरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहारावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी समितीच्या अध्यक्षांनी १४ जानेवारी रोजी व्यक्तीश: उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, या तारखेला पटोले अनुपस्थित राहिले. यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन जामीनपात्र वॉरंट बजावला व यावर ४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याप्रकरणी सोनाजी गवई यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. पिंपळगाव येथे पाणी पुरवठा योजनेंतर्गत विहीर खोदकाम व बांधकामाकरिता मिळालेल्या निधीचा योग्य उपयोग करण्यात आला नाही. अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. विहिरीची खोली ३० फूट असून यापैकी २० फुटांपर्यंतच्या बांधकामावर ५ लाख ९७ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती अकोला जिल्हा परिषदेच्या वकिलाने दिली होती.
ही बाब लक्षात घेता न्यायालयाने जिल्हा परिषदेकडून आतापर्यंत किती काम पूर्ण करण्यात आले व त्यावर किती खर्च झाला याची चौकशी करण्यासाठी अकोला येथील जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंत्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. आयुक्ताने अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने समिती अध्यक्षाला बोलावले होते. याचिककार्त्यातर्फे अ‍ॅड. अलोक डागा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)