शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, तलाव दुरुस्तीच्या मुद्यावर विरोधक आक्र मक

By admin | Updated: January 26, 2015 00:57 IST

अतिवृष्टी व पुरामुळे दीड वर्षापूर्वी नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, सिंचन क्षमता कमी झालेल्या तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करावा, शिक्षकांचे

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे दीड वर्षापूर्वी नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, सिंचन क्षमता कमी झालेल्या तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करावा, शिक्षकांचे समायोजन व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम तातडीने व्हावे, यासाठी सदस्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. विरोधकांनीही जिल्हा परिषदेची २८ जानेवारीची सभा वादळी ठरण्याचे संकेत दिले आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी सरकारकडे १६० कोटींची मागणी केली होती. परंतु जेमतेम ३२ कोटी मिळाले. प्राप्त निधीतून प्रस्तावित कामांचे कार्यादेश अद्याप निघालेले नाही. मार्चपूर्वी कामे पूर्ण न झाल्यास हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता सदस्यांनी वर्तवली आहे. २०११ च्या जनगणनेचा विचार करता ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३५५ उपकेंद्रांची गरज आहे. त्यानुसार ७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३९ उपकेंद्रांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु हा प्रस्ताव प्रलंबित आहे. पदाधिकारी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात कमी पडत असल्याने सदस्यांत नाराजी आहे.राष्ट्रीय पेयजल योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. अशी सदस्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.खासगी संस्थाचालक अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यास नकार देत आहे. इंदिरा आवास योजनेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा ग्रामीण यंत्रणेला अपयश आले आहे. आदी मुद्यावर सत्तापक्षासोबतच विरोधी सदस्य आक्रमक भूमिका घेणार आहेत.विरोधक जाब विचारणारमागणीनुसार शासनाकडून उपलब्ध निधीतून बांधकाम विभागाने प्रस्तावित कामांचे अद्याप कार्यादेश दिलेले नाही. मार्चपूर्वी हा निधी खर्च होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निधी अखर्चित राहण्याची शक्यता विरोधीपक्षनेते मनोहर कुंभारे यांनी व्यक्त केली. पाणीटंचाई , राष्ट्रीय पेयजल योजनांची कामे रखडलेली कामे शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न अशा मुद्यावरुन अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सभेत जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)नवीन कामे नाहीतमागील वर्षात जी कामे हाती घेतली होती. तीच सुरू आहेत. त्यात नवीन कामांची भर पडलेली नाही. कापूस व सोयाबीनला भाव नाही. घरकु लांची कामे थंड बस्त्यात असून पशुसंवर्धन विभागातही सावळागोंधळ सुरू आहे.संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी केला आहे.