'बुद्धांचे विचारच मानवतेला वाचवू शकतात' ; श्रीलंकेचे माजी मंत्री विजयदासा राजपक्षे यांनी व्यक्त केले मत
By आनंद डेकाटे | Updated: May 15, 2026 20:15 IST2026-05-15T20:15:26+5:302026-05-15T20:15:55+5:30
Nagpur : जगभरात वाढत चाललेली अशांती, संघर्ष आणि युद्धाच्या छायेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे करुणा, मैत्री आणि प्रज्ञेचे विचारच मानवतेला वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपदान श्रीलंकेचे माजी मंत्री डॉ. विजयदासा राजपक्षे यांनी केले.

Only Buddha's thoughts can save humanity; Former Sri Lankan Minister Vijayadasa Rajapaksa expressed his opinion
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात वाढत चाललेली अशांती, संघर्ष आणि युद्धाच्या छायेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे करुणा, मैत्री आणि प्रज्ञेचे विचारच मानवतेला वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपदान श्रीलंकेचे माजी मंत्री डॉ. विजयदासा राजपक्षे यांनी केले.
रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित तीन दिवसीय विश्व शांती परिषदेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन, संघकाया फाउंडेशन, आणि ग्लोबल युनायटेड एज्युकेशन अँड सोशल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले. सामूहिक बुद्ध वंदनेने परिषदेचा प्रारंभ झाला.
राजपक्षे म्हणाले, 'आज संपूर्ण जग युद्धाच्या विभीषिकेमुळे दुःखी आहे. अशा काळात बुद्धांनी दिलेले करुणा, मैत्री आणि प्रज्ञेचे विचारच समाज आणि राष्ट्रांमध्ये बंधुभाव प्रस्थापित करू शकतात.'
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीलंकेचे महानायक वेन. मदम्पगामा अस्सजी थिसा, अंबलगोडा धम्मलंकारा थेरो, खासदार अथुरलिये रथना थेरा उपस्थित होते.