शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’ विकला जातोय मांजा

By admin | Updated: January 13, 2017 02:05 IST

नागरिकांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या ‘नायलॉन’ मांजाविरोधात जनजागृतीचे प्रमाण वाढत आहे.

कसे आणणार नियंत्रण? काच लावलेल्या मांजावरदेखील बंदी प्रशासनाचे दुर्लक्षचयोगेश पांडे  नागपूरनागरिकांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या ‘नायलॉन’ मांजाविरोधात जनजागृतीचे प्रमाण वाढत आहे. बंदीनंतरदेखील चोरीछुप्या पद्धतीने बाजारात याची विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र राष्ट्रीय हरित लवादाने सर्व प्रकारच्या ‘कोटेड’ मांजावर बंदी लावली आहे. असे असतानादेखील ‘आॅनलाईन’ माध्यमातून या मांजांची सर्रास विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून यासंदर्भात कुठलीही कारवाईदेखील करण्यात आलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून नायलॉन तसेच काच लावलेल्या मांजामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. अनेकांचा यात मृत्यू झाला असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत. यासंदर्भात शासनाने पावले उचलत ‘नायलॉन’ मांजावर बंदी लावली. तर दुसरीकडे विविध प्राणिप्रेमी संघटनांच्या याचिकांनंतर राष्ट्रीय हरित लवादानेदेखील कुठल्याही प्रकारचे ‘कोटिंग’ असलेला मांजा विकण्यास मनाई केली आहे. मात्र असे असतानादेखील प्रशासनाकडून या आदेशांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. दुकानांमध्ये हा जीवघेणा मांजा विकला जात आहे, शिवाय विविध ‘आॅनलाईन शॉपिंग’च्या संकेतस्थळांवरदेखील हे विक्रीस उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी) प्रशासनाचे हातावर हातएरवी मोठमोठे दावे करणाऱ्या प्रशासनाकडून मात्र यासंदर्भात कुठलीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. एकाही ‘आॅनलाईन’ कंपनीला नोटीस बजावण्यात आलेली नाही.‘नायलॉन’ मांजाची विक्री करणाऱ्यांवर काही प्रमाणात धाडी टाकण्यात येत आहेत. मात्र काचेचा उपयोग करण्यात आलेल्या ‘कोटेड’ मांजावर बंदी असूनदेखील याची खुलेआम विक्री सुरू आहे. याबाबत प्रशासनातीलच अनेक अधिकारी व कर्मचारी यांना माहिती नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. नियमांचे पालन का नाही?मांजामुळे धोका असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. याबाबत जनजागृती सुरू असली तरी धोकादायक मांजाची विक्री करणारे व वापरणारे या दोघांवरही कारवाई करूनच वचक आणल्या जाऊ शकतो. प्रशासनाने यासंदर्भात प्रभावी पावले उचलणे अपेक्षित आहे. जर शहरात ‘हेल्मेटसक्ती’ची योग्य अंमलबजावणी झाली आहे तर मग मांजासंदर्भातदेखील होऊच शकते. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण वाढविले गेले पाहिजे, असे मत ‘सेव्ह स्पीचलेस आॅर्गनायझेशन’च्या संस्थापिका स्मिता मिरे यांनी व्यक्त केले.