शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाईन’-‘ऑफलाईन’चा घोळ संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने होतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने होतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता या परीक्षा ‘ॲनलाईन’ व ‘ऑफलाईन’ अशा ‘मिक्स मोड’मध्ये घेण्यात याव्यात, असा विद्वत्‌ परिषदेचा सूर आहे. त्यामुळे नेमक्या परीक्षा कशा पद्धतीने होणार, यासंदर्भात अद्यापही संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे. विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मिक्स मोड’पद्धतीनेच परीक्षा आयोजित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

परीक्षा कशा घ्यायचा याचा निर्णय विद्यापीठांना घ्यायचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मागील आठवड्यात नागपुरात दिली होती. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनीदेखील ‘मिक्स मोड’नेच परीक्षा होतील, असे सांगितले होते. ‘कोरोना’मुळे लांबलेल्या उन्हाळी परीक्षा विद्यापीठाने ‘ऑनलाईन’ व ‘ऑफलाईन’ अशा दोन्ही पद्धतींनी घेतल्या होत्या. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात. तेथे इंटरनेट, स्मार्टफोन अशा सुविधा नसल्याने त्यांची अडचण होते. त्यामुळे सर्वांना परीक्षेची संधी मिळावी यासाठी ‘मिक्स मोड’साठी विद्यापीठाचा आग्रह आहे.

मंगळवारी विद्वत्‌ परिषदेच्या बैठकीत या मुद्यावर सखोल चर्चा झाली. ‘ऑनलाईन’ परीक्षा तर होतीलच, मात्र सोबतच विद्यार्थ्यांना ‘ऑफलाईन’चा पर्यायदेखील खुला ठेवावा, असा बैठकीतील सूर होता. विद्यार्थ्यांचे एकूण हित लक्षात घेता ‘मिक्स मोड’नेच परीक्षेचे आयोजन करण्यावर आमचा भर असेल. यासंदर्भात विद्वत्‌ परिषदेच्या बैठकीत प्रस्तावदेखील संमत झाला आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी दिली.

‘स्पेशल टास्क कमिटी’ ठरविणार नियोजन

दरम्यान, परीक्षांचे नियोजन करण्यासाठी ‘स्पेशल टास्क कमिटी’ गठित करण्यात आली आहे. ही समिती परीक्षेच्या नियोजनासोबतच एकूण आराखडा तयार करेल. त्यानंतर संबंधित प्रस्ताव व्यवस्थापन परिषद व अभ्यास मंडळांसमोर मांडण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.