शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

कामठीत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:12 IST

कामठी : नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रीन टाऊन, लेखानगर परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी ...

कामठी : नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रीन टाऊन, लेखानगर परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी आरोपी तरुणास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी निखिल प्रकाश वानखेडे (२५) रा. गांगापूर, उमरेड हा कामठी नागपूर-मार्गावरील आसाराम नर्सिंग महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. याच परिसरातील २३ वर्षीय तरुणीही येथे नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाच्या मागील लेखानगर येथे ते वास्तव्यास आहे. निखिल हा गत दोन वर्षापासून सदर तरुणीवर एकतर्फी प्रेम करतो. या संदर्भात तरुणीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना निखिलकडून देण्यात येणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली होती. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी निखिल विरोधात उमरेड पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दाखल केली होती. उमरेड पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करून समजूत घातली होती. परंतु त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजता सुमारास निखिल हा सदर तरुणीच्या ग्रीन टाऊन लेखानगर परिसरातील रूमवर पोहोचला. तिथे गोंधळ घालत त्याने तरुणीला मारहाण केली व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर तरुणीने आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी १५ फेब्रुवारीला तरुणीने नवीन कामठी पोलीस स्टेशनला निखिल याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी निखिल विरुद्ध भादंवि कलम ३०७, ३४१, ३५४,(अ), ५०६, ५०४, ४५४ नुसार गुन्हा दाखल करून निखिल यास अटक केली. पोलिसांनी आरोपीला कामठी येथील प्रथम सत्र न्याय दंडाधिकारी डी.आर.भोळा यांचे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. ही कारवाई ठाणेदार संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनात दुयम पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके यांनी केली.