शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

दोषसिद्धीनंतर गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST

नागपूर : आरोपीला तडजोडयोग्य नसलेल्या गुन्ह्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आरोपी व फिर्यादी यांनी त्या गुन्ह्यात तडजोड केल्यास, ...

नागपूर : आरोपीला तडजोडयोग्य नसलेल्या गुन्ह्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आरोपी व फिर्यादी यांनी त्या गुन्ह्यात तडजोड केल्यास, केवळ त्या आधारावर संबंधित गुन्ह्याची संपूर्ण कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्णपीठाने दिला. या पीठात न्या. अतुल चांदुरकर, न्या. विनय जोशी व न्या. नितीन सूर्यवंशी यांचा समावेश होता.

अकोला जिल्ह्यातील माया खंडारे व रूपेश काळे यांच्या प्रकरणामध्ये यासंदर्भात उच्च न्यायालयाचे परस्परविरोधी मते आढळून आल्यामुळे योग्य खुलासा होण्यासाठी पूर्णपीठाची स्थापना करण्यात आली होती. तडजोडयोग्य नसलेल्या गुन्ह्यात झालेली तडजोड मंजूर करण्याचा न्यायालयाला अधिकार नाही. तसेच, अशा तडजोडीच्या आधारावर गुन्ह्याची संपूर्ण कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही असे पूर्णपीठाने सांगितले. याशिवाय त्यांनी वैवाहिक वाद व इतर दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात गुन्ह्याची संपूर्ण कारवाई रद्द केली जाऊ शकते असेही स्पष्ट केले. त्याकरिता संबंधित प्रकरणामुळे न्यायालयीन प्रक्रिया निरर्थक ठरेल असे आढळून यायला हवे. तसेच, न्यायाचे रक्षण करण्यासाठी गुन्हा रद्द करणे आवश्यक असल्याची जाणीव व्हायला हवी असे न्यायालयाने नमूद केले.