शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर चाचणीचे शिक्षकांना बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २७ जानेवारीपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू करताना शासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २७ जानेवारीपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याचे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी जारी केले आहे. त्यानुसार प्रथम चाचणी करावी लागणार आहे, त्यानंतरच शाळेत जाता येणार आहे.

शासन निर्देशान्वये २७ जानेवारीपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात लेखी संमती घेण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्व आस्थापनांच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या १,६८४ शाळा असून, येथे १ लाख ४८ हजार ७५६ विद्यार्थी संख्या आहे. तर १०,९९८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले तर बरे होईपर्यंत त्यांनी शाळेत उपस्थित राहू नये, असेही निर्देश वंजारी यांच्याकडून देण्यात आले आहेत.

शाळांचे निर्जंतुकीकरण

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये सुरू होत असलेल्या शाळांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक शाळेला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, सॅनिटायझर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भित्तीपत्रके आदी वितरीत करण्यात येणार आहेत.