शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नॉयलॉन मांजाला ‘काट’

By admin | Updated: December 31, 2015 03:04 IST

नागरिकांसह पक्ष्यांच्या जीविताला असलेला धोका विचारात घेता उच्च न्यायालयाने नॉयलॉन मांजाचा वापर व विक्री करण्यावर बंदी करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपूर : नागरिकांसह पक्ष्यांच्या जीविताला असलेला धोका विचारात घेता उच्च न्यायालयाने नॉयलॉन मांजाचा वापर व विक्री करण्यावर बंदी करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानाही शहरात या मांजाचा सर्रास वापर व विक्री सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या निर्देशानुसार शहर तहसीलदार एस.जी.समर्थ यांनी शहरातील पतंग विक्रे त्यांच्या प्रतिष्ठानांवर धाडी घालून ६० हजारांचा मांजा जप्त केला आहे. यापुढे नॉयलॉन मांजाची विक्री करताना आढळल्यास विक्रे त्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.मकरसंक्रांतीचे पर्व आकाशात पतंग उडवून साजरे केले जाते. त्यामुळे एक-दीड महिना शहरात सर्व भागात पतंग उडवणाऱ्यांची धमाल सुरू असते. परंतु यासाठी बंदी असलेल्या नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे मांजात अडक ल्याने अनेकजण जखमी होतात. वेळप्रसंगी काहींना जीव गमवावा लागतो. मागील काही वर्षात अशा घटना वाढल्या आहेत. तसेच पतंगाच्या मांजामुळे पक्षी जखमी होतात. अनेकदा त्यांनाही आपला जीव गमवावा लागतो. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने नॉयलॉन मांजाचा वापर व विक्री करण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाही अनेक विक्रे ते या मांजाची विक्री करीत असल्यासंदर्भात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत त्यांनी नॉयलॉन मांजा जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार समर्थ यांनी शहरातील मांजा विक्रे त्यांच्या प्रतिष्ठानावर धाडी घातल्या. ही कारवाई अशीच सुरू राहणार असून नॉयलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)