पारिचारिकेची पर्स हिसकावून नेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:11 IST2021-02-17T04:11:24+5:302021-02-17T04:11:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बँकेत रक्कम जमा करण्यास निघालेल्या एका पारिचारिकेच्या हातातून दोन दुचाकीस्वार लुटारूंनी पिशवी हिसकावून नेली. ...

The nurse's purse was snatched | पारिचारिकेची पर्स हिसकावून नेली

पारिचारिकेची पर्स हिसकावून नेली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बँकेत रक्कम जमा करण्यास निघालेल्या एका पारिचारिकेच्या हातातून दोन दुचाकीस्वार लुटारूंनी पिशवी हिसकावून नेली. या पिशवीत ८३ हजाराची रोकड आणि वेगवेगळे कार्ड तसेच मोबाईल असलेली पर्स होती. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी सोमवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली.

पारिचारिका कविता गाैतम देशपांडे (वय ३९) या रामदासपेठमधील एका खासगी इस्पितळात कार्यरत आहेत. त्या सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास धंतोलीच्या साठे मार्गावरून महाराष्ट्र बँकेत रक्कम जमा करण्यासाठी जात होत्या. अक्षयदीप बंगल्यासमोर अचानक दुचाकीवर आलेल्या दोन लुटारूंपैकी एकाने त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून घेतली. या पिशवीत ८३ हजार रुपये, मोबाईल तसेच विविध प्रकारचे कार्ड होते. देशपांडे यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, मदत मिळण्यापूर्वीच आरोपी सुसाट वेगाने पळून गेले होते. त्यांनी धंतोली ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. लुटारूंचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: The nurse's purse was snatched